Full Width(True/False)

संदीप नाहरची आत्महत्या की हत्या, मुंबई पोलिसांनी केला खुलासा

मुंबई- 'एमएम धोनी' सिनेमात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत काम करणारा अभिनेता संदीप नहार याने १५ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने बॉलिवूडपासून सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांनाच धक्का बसला. संदीप याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे या प्रकरणाकडे हत्येच्या दृष्टीनेही पाहिलं जात होतं. पण आता पोलिसांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक पोस्ट शेअर केली होती. यासोबतच त्याने एक व्हिडिओही शेअर केला होता. या पोस्टच्या माध्यमातून संदीपने पत्नी कंचन शर्माशी होत असलेल्या दररोजच्या भांडणाला तो वैतागला असल्याचं सांगितलं. पत्नीने त्याच्यावर मानसिक अत्याचार केल्याचा आरोप संदीपने यात केला. यानंतर त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, त्याच्या निधनानंतर या सर्व पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आले होते, त्यामुळे त्याच्या हत्येची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी संदीपने आत्महत्या केल्याचं स्पष्ट केलं आहे. संदीपच्या मृत्यूबद्दल पोलिसांनी सांगितलं की अभिनेत्याने त्याच्या खोलीला आतून कुलूप लावलं होतं. जेव्हा त्याची पत्नी कंचन यांनी वारंवार दार ठोठावलं तेव्हा तिला आतून काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर कंचनने चावीवाल्याला आणि घर मालकाला बोलावलं. जेव्हा दार उघडलं तेव्हा त्यांना संदीपचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. संदीपच्या जाण्याचा मोठा धक्का त्याच्या कुटुंबीयांना बसला आहे. १६ फेब्रुवारी रोजी संदीप नाहरचा मृतदेह ताब्यात घेण्यात त्याचा भाऊ आणि वडील गोरेगाव पोलीस ठाण्यात पोहोचले होते. अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार दाखल केली नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली. प्राथमिक माहितीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनाचा अहवालाची प्रतीक्षा असल्याची नोंद केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aq01sC