नवी दिल्लीः Elon Musk या नावाने सध्या जगाला हादरवून सोडले आहे. काही दिवसांपूर्वी अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांना मागे टाकून नंबर वन वर पोहोचलेल्या एलन मस्क लीगमधून बाजुला होऊन बिझनेस करण्यासाठी ओळखले जातात. एलन मस्क आता अनेक कंपन्यांचे सीईओ राहिलेले आहे. आता पर्यंत मस्क यांनी अनेक कंपन्यांना बनवले आणि त्यांना विकले आहे. वाचाः आता एलन मस्क भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांची अडचण वाढणार आहे. एलन मस्क यांच्यात व्यापार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी स्टारलिंक प्रोजेक्ट बेस्ड देशाची सरकारकडून परवानगी मागितली आहे. तूर्तास सरकारकडून यावर अद्याप उत्तर देण्यात आले नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये देशात TRAI ने ब्रॉडबँड कनेक्टिविटी ला जास्त प्रोत्साहन देण्यासाठी एक कन्सल्टेशन पेपर रिलीज केला आहे. एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स ने देशात व्यापार करण्यासाठी परवानगी मागितली आहे. SpaceX कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट ऑफ सॅटेलाइट गव्हर्मेंट अफेयर्स Patricia Cooper ने सांगितले की, त्यांच्या प्रोजेक्टमुळे देशात जबरदस्त नेटवर्क कनेक्टिविटी मिळणार आहे. कंपनीने स्टार लिंक प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळात १२ हजार नेटवर्क सॅटेलाइट पाठवण्याची योजना बनवली आहे. यामुळे भारतीयांना जबरदस्त कनेक्टिविटी मिळू शकते. वाचाः स्पेसएक्स चे स्टारलिंक प्रोजेक्ट इन-फ्लाइट इंटरनेट आणि मॅरिटाइम सुविधा उपलब्ध करणार आहे. या अंतर्गत चीन आणि भारतात काम करणार आहे. या दोन्ही देशात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी फलकन ९ रॉकेट्स स्टारलिंक उपग्रह पाठवण्याचे कार्य करीत आहे. यासाठी ६० सॅटेलाइट ला एकत्र पाठवले जात आहे. जर एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स च्या स्टारलिंग प्रोजेक्टची सुरुवात देशात सुरू झाली तर याचे सर्वात जास्त आव्हान मुकेश अंबानी यांना मिळणार आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओशी थेट सामना स्पेसएक्सशी होणार आहे. देशात गेल्या चार वर्षापासून जिओने स्वतःला सिद्ध करीत बाकीच्या टेलिकॉम कंपन्यांवर मात केली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aHhj3e