Full Width(True/False)

माझ्या सारख्या मुलाला त्यांनी हिरो बनवलं; रवी जाधव यांच्याबद्दल बोलताना प्रथमेश भावुक

मुंबई: '' या सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रथमेश परबनं दिग्दर्शक यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ या सिनेमानंतर मला छोट्या-मोठ्या भूमिका मिळतील असं वाटलं होतं, पण रवी जाधव सरांनी ‘टाइमपास’या सिनेमात थेट ‘हिरो’ म्हणून माझी निवड केली. यासाठी मी त्यांचा ऋणी आहे', असं प्रथमेश म्हणतो. ' इंडस्ट्रीत माझा कोणी बाप असेल तर ते रवी सर आहेत', अशी प्रांजळ प्रतिक्रिया प्रथमेशनं एका मुलाखतीत दिलीय. प्रथमेश आगामी 'टाइमपास ३'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. करिअरच्या प्रत्येक पायरीवर रवी जाधव यांचा पाठिंबा मिळाल्याचं तो सांगतो. ' मला मराठी धड बोलता येत नव्हतं, उंची कमी होती, रंग काळा हे असं असूनही लोकांना आपण आवडू शकतो हेच माझ्यासाठी दिलासा देणारं होतं. छोट्या भूमिका मिळतील या आशेत असतानाच रवी सरांनी मला 'हिरो' म्हणून उभं केलं. ते माझ्या इतर चित्रपटांतील भूमिकांविषयीही मला सांगत असतात. ते मला वडिलांसारखे आहेत. मी त्यांना कोणतेही आणि कितीही प्रश्न विचारतो आणि ते त्यांची शांतपणे उत्तरं देतात.' 'टाइमपास ३'चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सध्या चित्रपाटाच्या संहितेवर काम सुरु असून यावेळी देखील संवाद लेखनाची जबाबदारी अभिनेता-लेखक प्रियदर्शन जाधव याच्यावरच असल्याचं कळतंय. दगडूच्या मित्रांच्या त्रिकूटानं पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आता पुन्हा एकदा ही मित्रमंडळी काय धमाल करतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. सध्या कलाकार मंडळी सिनेमाचं वाचन करत असून लवकरच चित्रीकरणाला देखील सुरुवात होणार आहे. रवी जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OrWdP7