नवी दिल्लीः OTT guidelines: Amazon Prime ची 'तांडव' आणि 'मिर्जापूर' वर वाद उद्भवल्यानंतर वेब सीरीजसाठी गाइडलाइनची मागणी करण्यात आली होती. Over The Top content म्हणजेच OTT प्लॅटफॉर्म्स वर सध्या कोणतीही गाइडलाइन नाही. परंतु, आता वेब सीरीजमधील ऐकायला मिळणार नाही. सूचना आणि प्रसारण मंत्री (Ministrer of Information and Broadcasting) प्रकाश जावडेकर यांनी संसद सभागृहात बोलताना यासंबंधी खास माहिती दिली आहे. वाचाः वेब सीरीज बद्दल आम्हाला अनेक सूचना आणि तक्रारी मिळाल्या आहेत. त्यामुळे वेब सीरीजसाठी गाइडलाइन्स आणि सूचना तयार करण्यात आल्या आहेत. याला लवकरच लागू करण्यात येईल, असे जावडेकर यांनी सांगितले. भाजप खासदार महेश पोद्दार यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. इंटरनेटच्या सुविधेमुळे नेटफ्लिक्स () यासारखे अनेक OTT प्लॅटफॉर्मला भारतात मोठी मागणी आहे. त्याचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. करोना काळात चित्रपट गृह बंद असल्याने अनेकांनी ओटीटीवर धाव घेत आपले मनोरंजन साधले आहे. वाचाः झारखंडमधील भाजप खासदार महेश पोद्दार यांनी म्हटले की, वेब सीरीजमध्ये जास्त प्रमाणात अंग प्रदर्शन आणि अश्लिल भाषेचा वापर करण्यात येत आहे. काही सीरीजमुळे तरुणांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारकडून यावर बंधन घालणे गरजेचे आहे. OTT प्लॅटफॉर्म साठी रेग्युरेशन नंतर जवळपास ४० प्लॅटफॉर्म्स असून त्यावर परिणाम होणार आहे. यात Netflix, Amazon Prime आणि HotStar (Disney Plus) चा समावेश आहे. The Economic Times मध्ये आलेल्या वृत्तानुसार 'इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने आपली सेल्फ रेग्युलेशन टूलकिट तयार केली आहे. ज्यात अनेक गाइडलाइन्स आहेत. IAMAI च्या माहितीनुसार, मार्च एप्रिल पर्यंत व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर ते लागू करण्यत येईल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cXYuM7