Full Width(True/False)

सुयश टिळकचा सोशल मीडियाला राम-राम; चर्चेला उधाण

मुंबई :अभिनेता सोशल मीडियावर सातत्याने चाहत्यांशी संवाद साधतो. आता मात्र सुयशनं सोशल मीडियाला राम-राम ठोकला आहे. त्यानं एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. खलील जिब्रान यांचा एक कोट शेअर करत, त्यानं सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे.इतकंच नव्हे; तर नुकतीच त्यानं एक इन्स्टा स्टोरीही शेअर केली होती. ‘ऑफलाइन इज द न्यू लक्झरी’ असं त्यानं त्यात म्हटलं आहे. त्यानं असं का केलं असावं, अशी त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. याआधीही अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून काढता पाय घेतला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटी वेगवेगळ्या मुद्यांवर स्वत:ची मतं मांडताता.अनेक मंडळी इथं स्वत:चे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. अनेकदा या सगळ्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाला राम-राम केला. सुयशच्या या निर्णयामागेही ट्रोलिंगचं कारण नाही ना, अशी चर्चा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YHMuFX