Full Width(True/False)

'बघीरा' सिनेमातील सायको प्रभुदेवाने उडवली प्रेक्षकांची झोप

मुंबई- बॉलिवूड अभिनेता करोना काळापासून अनेकांची आयुष्य सुधारण्यासाठी झटत आहे. अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याने त्याच्या परीने शक्य तेवढी मदत केली. पुन्हा एकदा त्याने त्याच्या कामाने माणुसकीचं दर्शन घडवून आणलं आहे. त्याने उत्तराखंडमधील टिहरी गावात राहणाऱ्या चार मुलींची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. त्या मुलींना सोनूने दत्तक घेतलं आहे. उत्तराखंडमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे आलम सिंह पुंडीर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयादरम्यान ते एका भुयारात काम करत होते. त्यात त्यांचं निधन झालं. पुंडीर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब अनाथ झालं. आलम यांना चार मुली आहेत ज्यांच्यासमोर संपूर्ण आयुष्य कसं काढायचं असा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. या मुलींबद्दल माहिती मिळताचं सोनूने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. सोनूने ट्विटरवर या मुलींचा फोटो शेअर करत म्हटलं, 'हे कुटुंब आता माझं आहे.' या मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतची जबाबदारी सोनू स्वतः पार पाडणार आहे. यासंदर्भात मीडियासोबत बोलताना सोनू म्हणाला, 'ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, आपण अडचणीत असणाऱ्या व्यक्तींची मदत केली पाहीजे. अशा कठीण परिस्थितीमध्ये जे नुकसान झालं आहे, तिथे प्रत्येक संभाव्य मदत केली गेली पाहीजे.' सोनूच्या या निर्णयानंतर आलम यांच्या कुटुंबियांना आणि मुलींना प्रचंड आनंद झाला आहे. मोठ्या अडचणीतून सोनूने त्यांना बाहेर काढले आहे. या निर्णयाने सोनूने इतरांना पुन्हा एकदा माणुसकीचा धडा दिला आहे. त्याने अनेकांची आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k8hysi