Full Width(True/False)

RedmiBook Pro 14 आणि रेडमीबुक प्रो 15 लाँच, पाहा खास वैशिष्ट्ये

नवी दिल्लीः रेडमीने मार्केट मध्ये आपले दोन नवीन लॅपटॉप आणि लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये थंडरबोल्ट पोर्ट आणि 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर दिला आहे. रेडमीचे हे नवीन लॅपटॉप जबरदस्त बिल्ड क्वॉलिटी सोबत येते. कंपनीने यात एव्हिएशन ग्रेडचे अॅल्यूमिनियमचा वापर केला आहे. रेडमी बुक प्रो १४ ची सुरुवातीची किमत ४६९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ५३ हजार रुपये आहे. तसेच रेडमी बुक प्रो १५ ची सुरुवातीची किंमत ४९९९ चिनी युआन म्हणजेच ५६ हजार ५०० रुपये आहे. वाचाः RedmiBook Pro 14 चे खास फीचर्स विंडोज १० ओएस सोबत या लॅपटॉपमध्ये मल्टिटास्किंग साठी XiaoAi AI असिस्टेंटसोबत MIUI+ सॉफ्टवेयर दिले आहे. लॅपटॉपची स्क्रीन १४ इंच आहे. जी 2560x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत येते. लॅपटॉपचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ८८.२ टक्के आहे. लॅपटॉपमध्ये ११ जनरेशन इंटेल कोर i7-1165G7 प्रोसेसर दिला आहे. लॅपटॉपमध्ये १६ जीबी पर्यंत DDR4 ड्यूल चॅनल रॅम दिले आहे. लॅपटॉपमध्ये ५१२ जीबीची PCIe एसएसडी स्टोरेज स्टँडर्ड दिले आहे. वाचाः कनेक्टिविटीसाठी लॅपटॉपमध्ये वाय फाय ६, ब्लूटूथ ५.१ शिवाय, सर्व स्टँडर्ड ऑप्शन मिळतात. दमदार साउंडसाठी यात डीटीएस ऑडियो सोबत ड्यूल स्टिरियो स्पीकर दिले आहेत. या लॅपटॉपमध्ये ५६ Whr बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर ही बॅटरी १२ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. RedmiBook Pro 15 चे खास फीचर्स या लॅपटॉपमध्ये 3200x2000 पिक्सल रेजॉलूशन सोबत १५.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. लॅपटॉपचे स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९.१ टक्के आहे. स्क्रीन 90Hz के रिफ्रेश रेट सोबत येते. १६ जीबी पर्यंत LPDDR4 ड्यूल चॅनल रॅम सोबत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये ५१२ जीबीचे PLIe एसएसडी स्टोरेज मिळते. प्रोसेसर म्हणून या लॅपटॉपमध्ये ११ जनरेशन इंटेल कोर i7-11370H प्रोसेसर दिले आहे. वाचाः लॅपटॉप मध्ये 70Whr बॅटरी मिळते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर १२ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. चार्जिंग साठी या लॅपटॉप सोबत १०० वॉटचे यूएसबी टाइप सी पॉवर अडॅप्टर मिळते. दमदार साउंड आउटपूट साठी या लॅपटॉपमध्ये डीटीएस ऑडियो सोबत एक ड्यूल स्टिरियो स्पीकर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dQbbZI