Full Width(True/False)

देवमाणूस! राखी सावंतच्या आईच्या उपचारांसाठी धावला सलमान खान

मुंबई- 'बिग बॉस १४' ची स्पर्धक असणारी अभिनेत्री सध्या तिच्या आईच्या काळजीत आहे. राखी 'बिग बॉस' च्या घरात असताना तिच्या आईला कर्करोगावरील उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. आईच्या तब्येतीबद्दल राखीला तिच्या भावाकडून समजलं होतं. आता जेव्हा राखी घराबाहेर आली आहे, तेव्हा ती आईची सुश्रूषा करण्यात व्यग्र आहे. राखीच्या आईवर सध्या केमोथेरपी सुरू आहे. तिने इस्पितळातून एक व्हिडीओ शेअर करत आईच्या उपचारांचीही माहिती दिली. याशिवाय आईच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या याचेही तिने व्हिडिओत आभार मानले. राखीच्या आईला पित्ताशयाच्या कर्करोग झाला आहे. पित्ताशयात कर्करोगाची मोठी गाठ असल्याचं निदान समोर आलं होतं. यानंतर तातडीने तिच्यावर उपसार सुरू करण्यात आले. राखीने 'बिग बॉस' मधून बाहेर येताच आईला भेटण्यासाठी धाव घेतली होती. तिने आईसोबतचे काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आणि चाहत्यांना आईच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंतीदेखील केली. आता राखीने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात राखीची आई सलमानने केलेल्या मदतीसाठीचे आभार मानले. यासोबतच त्याला उदंड आयुष्य लाभो यासाठीही आशीर्वाद दिले. या व्हिडिओत राखीची आई म्हणते, 'सलमान तुझे खूप आभार, सोहेल तुझेही आभार. माझ्यावर आता केमोथेरपी सुरू आहे आणि मी आता इस्पितळात आहे. आतापर्यंत चार सेशन झाले आहेत आणि आता फक्त दोन सेशन बाकी आहेत. ज्यानंतर माझं ऑपरेशन करण्यात येईल. तुझे खूप आभार. देव तुम्हाला यशस्वी करो. तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होवोत.' यापूर्वी राखीने 'बिग बॉस १४' च्या फिनालेच्या दिवशी सलमानसोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होतो आणि सलमान तू माझा देव आहे. देव तुला सदैव आनंदी ठेवो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत,' असं लिहिलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NFZvhu