Full Width(True/False)

ओशोंच्या भूमिकेत असलेल्या या सुपरस्टारला ओळखलं का?

मुंबई- अध्यात्मिक जगतात भारतातील गुरू आचार्य रजनीश यांचं नाव नेहमीच वादात राहिलेलं आहे. आचार्य रजनीश यांना म्हणूनही ओळखलं जातं. आतापर्यंत ओशोंवर बरेच माहितीपट आणि लघुपट बनवले गेले आहेत. आता त्यांच्या आयुष्यावर एक हिंदी सिनेमाही होत आहे. यात अभिनेता आणि भाजप खासदार ओशोंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात ओशोच्या जीवनाशी संबंधित वादग्रस्त बाबी दिसतील. या सिनेमाचं नाव 'सिक्रेट्स ऑफ लव्ह' असं असेल. दिग्दर्शन रितेश एस. कुमार सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमात ओशोंचं तत्त्वज्ञान, त्यांचा जीवन प्रवास आणि जगभरात प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेतील सरकारसोबतचा वाद यांसारख्या महत्त्वाच्या घटना यात असणार आहेत. या सिनेमाविषयी बोलताना रवी किशन म्हणाले की, 'जेव्हा तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्यास सांगितलं जातं जे केवळ वादग्रस्तच नाही तर लोकप्रियही आहे, तेव्हा ती फार मोठी जबाबदारी असते. ओशोंची व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल फार गोष्टी वाचाव्या लागल्या आणि त्यांच्याबद्दल संशोधनही करावं लागलं.' पुढे बोलताना रवी किशन म्हणाले की, 'जेव्हा मी रितेशला मला या भूमिकेसाठी का निवडले हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की माझे डोळे ओशोंसारखे वाटतात. ओशोंच्या गेटअपमधला माझा फोटो त्यांनी पाहिला. ओशोंची भूमिका साकारताना मला खूप मजा आली. ' ओशो आणि त्यांची पर्सनल सेक्रेटरी मां आनंद शीला यांच्यावर अनेकदा चित्रपट बनविण्यासाठी चर्चा याआधीही झाली आहे. २०१८ मध्ये अशी चर्चा रंगली होती की शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली एक चित्रपट तयार केला जाऊ शकतो ज्यात आमिर खान ओशो आणि आलिया भट्ट मां आनंद शीलाची भूमिका साकारू शकेल. पण त्यानंतर या सिनेमाचं पुढे काहीच चर्चा झाली नाही. एवढंच नाही तर २०१९ मध्ये प्रियांका चोप्रानेही तिला मां आनंद शीलाच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे असं सांगितलं होतं. मात्र, आनंद शीला यांनी याला परवानगी दिली नाही आणि प्रियंकाला कायदेशीर नोटीस पाठविली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bLFkqD