Full Width(True/False)

रणबीर आलियासाठी साकारतोय स्वप्नातलं घर, वाचा काय आहे खास

मुंबई- बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे आणि यांची जोडी. दोघांना एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतं. ते दोघेही नेहमी एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. रणबीरच्या मनातदेखील अशीच इच्छा असावी कारण तो त्यांचं स्वप्नातलं घर साकारण्यात व्यग्र असल्याचं दिसतंय. यावरून ते लवकरच त्यांच्या लग्नाची घोषणा करतील असा चाहत्यांचा अंदाज आहे. रणबीर खास आलियासाठी आलिशान घर साकारण्यात गुंतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरला त्यांच्या घरात आलियाचा एक मोठा कॅनव्हास फोटो लावायचा आहे. ज्यात आलियाचे अनेक कॅण्डीड फोटो असतील. रणबीरची ही मागणी पूर्ण करण्यासाठी इंटेरिअर डिझायनर प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. इतकंच नाही तर, आलियाच्या अनेक फोटोंना एकत्र करून मोझॅक टाइल्समध्ये लावले जात आहेत. त्यामुळे घराची शोभा तर वाढणार आहेचं, शिवाय त्यातून रणबीरचं आलियावरील प्रेम व्यक्त होणार आहे. आलियादेखील घराचा एक खास कोपरा सजवत आहे. जिथे ती रणबीर आणि त्याच्या कुटुंबांचे जुने फोटो लावणार आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि घरात आपलेपणा आणण्यासाठी ती हे करणार असल्याचं बोललं जातंय. रणबीरने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना म्हटलं होतं की, 'जर लॉकडाउन झालं नसतं, तर आम्ही या आधीच लग्न केलं असतं. मी लवकरच या नात्याला पूर्णत्वाला नेणार आहे. मी या नात्याबद्दल जास्त काही बोलून नात्यातील गोडवा कमी करू इच्छित नाही.' सध्या रणबीर आणि आलियाच्या घराचं काम जोरात सुरू असून काही दिवसांपूर्वी त्या दोघांना नीतू कपूरसोबत त्यांच्या घराची पाहणी करताना पाहिलं गेलं होतं. रणबीर आणि आलियाचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kv6t4X