Full Width(True/False)

सुखी संसार मोडला! किम कर्दाशियन-कान्ये वेस्ट घेणार घटस्फोट

मुंबई: रिअलिटी टीव्ही स्टार लवकरच पती आणि प्रसिद्ध हॉलिवूड रॅपर कान्ये वेस्टपासून घटसफोट घेत आहे. यासाठी या दोघांनीही न्यायालयात अर्ज दिला आहे. मागच्या काही दिवसांपासू कान्ये आणि किम यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्यानं दोघंही वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. किमच्या पब्लिसिस्टनं किमनं घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती न्यूज एजन्सी APF ला दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार किमनं फक्त घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केलेला नाही तर त्यासोबतच तिनं आपल्या चारही मुलांच्या जॉइन्ट कस्टडीची मागणी न्यायालयाकडे केली आहे. किमच्या बाजूनं घटस्फोटाची ही केस वकील Laura Wasser पाहणार आहे. मात्र याबाबात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. मागच्या काही दिवसांपासून किम आणि कान्ये यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपासून हे दोघंही वेगवेगळ्या घरात राहत आहेत. त्यानंतर अमेरिकन न्यूज पोर्टल TMZ ने त्याचवेळी त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. किम आणि कान्ये यांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. इटलीमध्ये या दोघांचा भव्य विवाहसोहळा पार पडला होता. किम कर्दाशियन आणि हे दोघंही जगातील प्रसिद्ध सेलिब्रेटी कपल्समध्ये गणले जातात. दोघांच्या खासगी आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्य देखील अनेकदा चर्चेत असतं. २००७ मध्ये आलेल्या एका टीव्ही मालिकेतून किमला प्रसिद्धी मिळाली होती. ज्यात तिनं तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. किमचं कान्येसोबत हे दुसरं लग्न होतं. या दोघांची ओळख २०१२ मध्ये झाली होती. कान्येआधी तिनं प्रसिद्ध फुटबॉलपटू Kris Humphries शी लग्न केलं होतं. पण हे दोघं २०१३ मध्ये विभक्त झाले आणि २०१४ मध्ये किमनं कान्येशी लग्न केलं. एकीकडे किमनं कॉस्मॅटिक प्रॉडक्शनमध्ये चांगलं नाव कमावलं आहे तर दुसरीकडे कान्ये सुद्धा हॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आहे. त्यानं ग्रॅमी अवॉर्ड सुद्धा जिंकला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NK1aSG