मुंबई: टीव्ही अभिनेत्री आई झाली असून ९ फेब्रुवारीला रात्री तिनं मुलाला जन्म दिला. अनिताचा पती रोहित रेड्डीनं ही गोड बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर अनिताच्या मुलाचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अनिता आणि तिचा नवरा बाळाच्या आगमनानं खूपच आनंदी असल्याचं दिसत आहे.डिलिव्हरीनंतर अनिता आणि रोहितचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनितानं ९ फेब्रुवारीला रात्री गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर तिचे हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती पती रोहित रेड्डीसोबत दिसत असून या दोघांच्या चेहऱ्यावरील हसू पाहता ते दोघंही किती खूश आहेत हे समजून येत आहे. पण त्यांच्या या फोटोंसोबत त्यांच्या मुलाचाही एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बाळाच्या जन्मानंतर लगेच क्लिक करण्यात आला आहे. Elfa World या इन्स्टाग्राम हॅन्डलवरून अनिताच्या बाळाच्या जन्मानंतरचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात बाळाची झलक फोन स्क्रिनवर पाहायला मिळत आहे. अनिता आणि रोहित याच्या लग्नानंतर जवळपास ८ वर्षांनंतर हे दोघंही आई-बाबा झाले आहेत. त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहताना दिसत आहे. चाहते सुद्धा सोशल मीडियावरून या दोघांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. डिलीव्हरीच्या काही दिवस आधीच अनितानं एक फोटोशूट केलं होतं. त्यातील एक फोटो शेअर करत रोहितनं ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये रोहित अनिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. प्रेग्नन्सीच्या संपूर्ण काळात अनिता सोशल मीडियावर सक्रिय होती. यावेळची तिची फोटोशूट सुद्धा बरीच चर्चेत राहिली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cUbGS5