मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यांनी १६ वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेच्या काही दिवस अगोदरच लगीन गाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा आज १६ वा वाढदिवस. नम्रता आणि महेश दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडिया पोस्टमधून ते एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. आजही लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोघांनीही एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत अनोख्या अंदाजात एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रतानं चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. पण महेश बाबू मात्र त्याला आतापर्यंत मिळालेलं प्रत्येक यश हे फक्त नम्रताच्या सपोर्ट मिळू शकलं हे सांगियला कधीच विसरत नाही. लग्नाच्या वाढदिवसाला महेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नम्रतासोबतचा फ्लाइटमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो तिला कपाळावर किस करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'हॅप्पी १६ NSG... तुझ्यासोबत कायमचं आणि त्याही पलिकडे' त्याच्या या पोस्टवर नम्रतानं, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे एमबी' अशी कमेंट केली आहे. नम्रता शिरोडकरनंही महेशबाबूला अनोख्या अंदाजत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं त्यासोबतचा एक अनसीन फोटो शेअर करताना लिहिलं, 'इझी पीझी १६! आमच्या लग्नाच्या रेसीपीमध्ये प्रेम आणि विश्वासचं एक चांगलं मिश्रण आहे. सर्वांचे आशिर्वाद असेच कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा एमबी मी तुझ्यावर खूप प्रेम करते.' नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात २००० मध्ये चित्रपट 'वामसी'च्या सेटवर झाली होती. त्यानंतर काही वर्षं महेशला डेट केल्यानंतर नम्रतानं स्वतःपेक्षा ३ वर्षांनी लहान महेश बाबूशी २००५मध्ये लग्न केलं. पण एकमेकांना डेट करत असताना या दोघांनीही हे नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. या दोघांनाही दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नावं आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Nb8zu7