मुंबई- बॉलिवूड अभिनेता या दिवसांत जैसलमेरमध्ये असून तो त्याचा आगामी चित्रपट '' चं चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. असंही म्हटलं जातं की , 'बच्चन पांडे' हा चित्रपट अक्षयच्या 'वेलकम' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 'वेलकम' मध्ये अक्षय कुमार डॉन उदय शेट्टी आणि मजनूला सुधारण्यासाठी एका खोट्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आधार घेतो. तसंच, या चित्रपटात अक्षय स्वतःच एका गुंडाची भूमिका करताना दिसणार आहे, ज्याला सुधारण्यासाठी पुढाकार घेते. चित्रपटात अक्षयला सुधारण्याची जबाबदारी पत्रकार असलेल्या क्रितीची आहे. तर, पंकज त्रिपाठी एका भटजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण २ मार्चपर्यंत जैसलमेरमध्ये होणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षय सहाय्यक दिग्दर्शकाकडून भाषा शिकत आहे. या चित्रपटात 'वेलकम' मधील स्नेहल डाबी या कलाकारालादेखील संधी देण्यात अली आहे जो मजनू भाईचा उजवा हात बनला होता. साजिद नाडियाडवाला यांच्या टीमने या गोष्टीचं समर्थन केलं आहे. त्यांच्यानुसार, बच्चन पांडे युपी मधील असल्याने त्याच्या बोलण्यात तिथल्या भाषेचा लहेजा आहे. पत्रकार क्रिती त्याच्यासाठी चित्रपट बनवायचा घाट घालते आणि त्यानंतर अक्षय गुन्हेगारी वृत्ती सोडून देतो, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. टीमने दिलेल्या माहितीप्रमाणे चित्रपटात अर्शद वारसी, संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी यांची भूमिकाही अत्यंत दमदार असणार आहे. अर्शद हा क्रितीचा सहाय्यक असणार आहे. सगळ्या कलाकारांचे चित्रीकरण एकत्र होणार नसून एक दिवस आड कलाकार चित्रीकरण करत आहेत. पंकज त्रिपाठी यांच्यानुसार बच्चन पांडेची भूमिका अत्यंत उत्कृष्ट आणि दमदार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qmzBNW