मुंबई- बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याच्या दमदार अभिनयाने भरपूर असा '' चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवण्यास समर्थ ठरली. चित्रपटातील इतर कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट आणखी दर्जेदार बनला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अजय देवगनच्या करियरमधील अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. लवकरचं या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असणारा 'दृश्यम' हा मुळात मल्याळम अभिनेते मोहनलाल यांच्या 'दृश्यम' चित्रपटाचा रिमेक होता. आता पुन्हा एकदा मोहनलाल यांचा '' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनविण्याची तयारी सुरु झालीये. निर्माते कुमार मंगत यांनी या चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत, ज्यासाठी त्यांना बरीच मोठी रक्कम मोजावी लागली आहे. चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यात आल्याने प्रेक्षकांना 'दृश्यम २' ची उत्सुकता लागून राहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात 'दृश्यम' मधील कथेचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे. जिथे कथा संपली, ती तिथूनच पुन्हा सुरु होणार आहे. त्यावरून प्रेक्षक पुन्हा एकदा पणजीत २ ऑक्टोबर रोजी सत्संग होणार असल्याचा अंदाज लावत आहेत. 'दृश्यम २' मध्ये अजय पुन्हा अभिनेत्री तब्बू सोबतचं काम करताना दिसणार आहे. निर्माते चित्रपटाचं चित्रीकरण २०२१ च्या शेवटी सुरु करणार आहेत.हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. अजय देवगन आणि कुमार मंगत मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uedziR