मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालं होतं. सगळ्याच क्षेत्रामध्ये कोरोनाचा परिणाम पाहायला मिळाला. चित्रपटसृष्टीही पूर्णपणे थंडावली होती. चित्रीकरणच ठप्प असल्यामुळे कलाकार मंडळींना देखील लाखो रुपयांच नुकसान सहन करावं लागलं. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये अभिनेता रणवीर सिंगने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीमध्ये रणवीरच नाव सामिल आहे. रणवीर त्याच्या उत्तम अभिनयामुळे सातासमुद्रापलिकडे पोहचला. कोरोनासारख्या कठीण प्रसंगातही त्याच्याकडे कामाचा ओघ सुरुच होता. कोरोना काळात जवळपास त्याने नऊ नवे ब्रॅण्ड साईन केले. आणि त्यामुळे त्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. रणवीरने कमावले ७० कोटी रुपये रणवीर एका ब्रॅण्डचं प्रमोशन करण्यास जवळपास ७ ते १२ कोटी रुपये घेतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर जळपास ३४ ब्रॅण्डचं प्रमोशन करत आहे. यामधून त्याने ७० कोटी रुपये कमावले आहेत. रणवीरची वाढती लोकप्रियता पाहून त्याच्याकडे एकापाठोपाठ एक काम येणं सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाऊनकाळातही त्याने कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. सारं काही ठप्प असताना रणवीरने केलेली कमाई पाहून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नव्हे तर चित्रपटसृष्टीमध्येही रणवीरच्या चित्रपटांची सध्या चलती आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘गली बॉय’, ‘पद्मावत’, ‘गोलियों की रासलिला रामलीला’ यांसारख्या त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. बडे दिग्दर्शकही रणवीर त्यांच्या चित्रपटांसाठी साईन करण्यास उत्सुक असतात. शिवाय आताही त्याच्या हाती चार ते पाच बिग बजेट हिंदी चित्रपट आहेत. त्याचा ‘८३’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तसेच ‘जयेशभाई जोरदार’, ‘सर्कस’ यांसारख्या चित्रपटांवरही तो सध्या काम करत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YNgYGI