Full Width(True/False)

नोकिया ३.४ ची विक्री भारतात सुरू, पाहा किंमत-फीचर्स, 'ही' ऑफर मिळणार

नवी दिल्लीः ला या महिन्यात भारतात ५.४ स्मार्टफोनसोबत लाँच करण्यात आले होते. आज नोकिया ३.४ स्मार्टफोनची विक्री देशात सुरू करण्यात आली आहे. याआधी या आठवड्यात एचएमडी ग्लोबलने नोकिया ५.४ ला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. नोकिया ३.४ मध्ये ६.३ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि त्याची खास वैशिष्ट्ये. वाचाः नोकिया ३.४ ची किंमत आफर्स नोकिया ३.४ स्मार्टफोनला देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर खरेदी साठी उपलब्ध करण्यात आले आहे. रिलायन्स जिओ ग्राहक फोन खरेदीवर ४ हजार रुपयांचा फायदा मिळवू शकतात. यात ३४९ रुपयांच्या रिचार्जवर २ हजार रुपयांचा कॅशबॅक आणि २ हजार रुपयांचा पार्टनर वाउचर याचा समावेश आहे. ही ऑफर आताच्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या फोनला गुगल पॉडकास्ट प्री लोड येते. वाचाः फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन डस्क, चारकोल आणि फियॉर्ड कलर मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट , अॅमेझॉन शिवाय नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकतो. वाचाः नोकिया ३.४ चे वैशिष्ट्ये नोकिया ३.४ मध्ये ६.३ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. याचा रेजॉलूशन 720 x 1560 पिक्सल आहे. स्क्रीनची पिक्सल डेनसिटी २६९ पीपीआय आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० चिपसेट दिला आहे. ग्राफिक्ससाठी ६१० जीपीयू दिला आहे. फोनमध्ये रियरवर तीन कॅमेरे दिले आहे. जो १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः नोकिया ३.४ फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे. हँडसेट मध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी पोर्ट दिले आहे. फुल चार्ज मध्ये बॅटरी दोन दिवसांपर्यंत बॅटरी चालते. याशिवाय रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ४.२, वाय फाय ८०२.११ बीजीएन, जीपीएस सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NMLez2