मुंबई: सिनेसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी सिनेकरिअर करतानाच आपला जोडीदार निवडला. तर छोट्या पडद्यावरदेखील काहीजण जीवनसाथी बनले तर काही बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनले. काही जोडीदारांनी आपल्या पार्टनरला शेवटपर्यंत साथ दिली. तर काहींचा संसार मात्र अर्ध्यावरच मोडला. मराठी सिनेसृष्टीतही अशा अनेक जोड्या आहेत ज्याच्या घटस्फोटांची ब्रेकअपची प्रचडं चर्चा झाली. या सेलिब्रिटींचा ब्रेकअप चाहत्यांसाठी एक धक्काच होता. सध्या मराठी सिनेसृष्टीत एका खास कपलच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरू आहे. 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच सुयशनं एक भावुक आणि अर्थपूर्ण अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं प्रेम करण्याव्यक्तीबद्दल, खास नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहे. एखाद्यावर प्रेम केलं तर ते निस्वार्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या कठिण काळात त्याच्या पाठिशी उभं राहायला हवं, याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. सुशय आणि अक्षया हे मराठी सिनेसृष्टीतील खास कपल म्हणून ओळखलं जात होतं. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबूली दिली होती. नात्याची चर्चा २०१८मध्ये अक्षया आणि सुयशनं त्यांच्या नात्याच्या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकलं की काय असं वाटतं होतं. 'सर्वत्र प्रेम, सकारात्मकता आणि आनंद पसरवा' असं लिहीत सुयशनं दोघांचा एक फोटो शेअर केला होता. त्यात अक्षयाच्या हातात एक मोठी हिऱ्याची अंगठी दिसत होती. त्यामुळं दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरू होती. मात्र या केवळ अफवा असल्याचं त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितलं होतं खरं तर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाला राम-राम ठोकला होता. परंतु आता त्यानं अशी पोस्ट शेअर केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं एक पोस्ट शेअर खलील जिब्रान यांचा एक कोट शेअर केला होता. ‘ऑफलाइन इज द न्यू लक्झरी’ असं त्यानं त्यात म्हटलं होतं.त्यानं असं का केलं असावं, अशी त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चा होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ppuEmb