मुंबई: ख्यातनाम पॉप गायिका , स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यानंतर भारतातील सेलिब्रिटी देखील व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटपटू यानं देखील यासंदर्भात ट्विट केलं होतं. रोहितच्या ट्विटला उत्तर देतानाअभिनेत्री हिनं त्याच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहितवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर कंगनानं ते ट्विट डिलीट केलं असलं तरी, रोहितच्या चाहत्यांकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे. 'जेव्हाही आपण एकत्र उभं राहिलो आहे, तेव्हा तेव्हा भारत आणखी ताकदवान झाला आहे. काही तरी पर्याय किंवा उपाय नक्कीच काढावा लागेल. आपल्या देशात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मला आशा आहे की, आपण सर्व एकत्र येऊन काही तरी उपाय नक्कीच काढू', असं ट्विट रोहितनं केलं होतं.रोहितच्या या ट्विटला उत्तर देताना कंगनानं आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. क्रिकेटपटूंची अवस्था अशी का झाली आहे, 'ना घर का ना घाट का'. शेतकरी अशा कायद्याविरुद्ध का जातील जो त्यांच्यासाठीच क्रांतिकारी ठरणार आहे. हे दहशदवादी आहेत, जे गोधंळ घालतायत. असं बोलायला भीती का वाटतेय?, अशा भाषेत कंगाननं रोहितला उत्तर दिलं होतं. त्या नंतर कंगनानं ते ट्विट डिलीट केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NWpdho