मुंबई- मुंबईतील राहत्या इमारतीमध्ये अवैध बांधकाम केल्याप्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी बीएमसीला आव्हान देणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. परंतु, त्याच्या वकिलाने ती याचिका माघारी घेतली आहे. सोनू सूदचा वकील मुकुल रोहतगीने न्यायालयाला याबाबतील स्पष्टीकरण देताना म्हटले, 'सोनुने महानगर पालिकेला यासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे. आता ते पालिकेच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.' सोनुला मुंबईच्या जुहू परिसरातील त्याच्या राहत्या घरात केलेल्या अवैध बांधकामाबद्दल उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्याने नगर आयुक्तांची परवानगी घेऊनचं हे बदल केले असल्याचे सांगत याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे, १३ जानेवारी २०२१ रोजी उच्च नायायालयाने महाराष्ट्र क्षेत्र आणि नगर योजना नियम १९६६च्या कलम ४६ लक्षात न घेता ही नोटीस पाठवली. निवासी इमारतीला हॉटेलमध्ये बदलण्यासाठी सोनुने संबंधित विभागाला २०१८ साली अर्ज केला होता. जो मान्य करण्यात आला होता. मागील वर्षी कोरोनाच्या साथीमध्ये सोनुने अनेक गरजू व्यक्तींना आवश्यक सर्व मदत केली होती. त्याने मजुरांना त्यांच्या राहत्या गावी जाण्यासाठी बसेसची देखील व्यवस्था केली. महानगर पालिकेनुसार सोनुने 'शक्ती सागर' या इमारतीत मूलभूत बांधकामात फेरफार करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. त्याचं संबधी महानगर पालिकेने सोनूला नोटीस बजावली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2O4FMYB