Full Width(True/False)

२४ फेब्रुवारीपासून Flipkart Mobile Bonanza Sale, स्वस्तात खरेदी करा 'हे' स्मार्टफोन

नवी दिल्लीः Flipkart : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाच दिवस चालणारा हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः अतिरिक्त बचत करा या सेल दरम्यान, स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुमची एक्स्ट्रा बचत सुद्धा होणार आहे. या सेलसाठी ICICI Bank सोबत पार्टनरशीप करण्यात आली आहे. म्हणजेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनचा वापर केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. Realme 7 Pro क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, सुपर अमोलेड डिस्प्ले आणि ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेल्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर २ हजार रुपयांच्या सूटनंतर १७ हजार ९९९ रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे. रियलमीच्या या फोनची किंमत सध्या १९ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Apple iPhone 11 अॅपल आयफोन मॉडलच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला २ हजार रुपयांच्या सूटनंतर ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या मॉलची किंमत सध्या ५१ हजार ९९९ रुपये आहे. Moto G 5G मोटोरोला ब्रँडच्या या ५ जी स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिल्यानंतर १९ हजार ९९९ रुपयात हा फोन खरेदी करता येऊ शकतो. वाचाः iPhone 11 Pro ट्रिपल रियर कॅमेरा सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत या सेलमध्ये ७९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनची किंमत ८२ हजार ९९९ रुपये आहे. याचाच अर्थ या फोनवर ३ हजार रुपयांची बचत करता येऊ शकते. Oppo A12 ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत या फोननला खरेदी करायचे असेल तर या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनची सध्याची किंमत ८ हजार ९९० रुपये आहे. १ हजार रुपयांची सूटनंतर या फोनला ७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकते. फोनमध्ये ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OUNXXP