नवी दिल्लीः Prepaid Plans Under Rs. 50: टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्संसाठी जबरदस्त सर्विस उपलब्ध करण्यासाठी अनेक प्लान्स उपलब्ध करते. रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आणि बीएसएनएल कंपन्यांचे असे अनेक प्लान उपलब्द आहेत. जे जास्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतात. याची किंमत पण जास्त नसते. असे अनेक प्लान्स आहेत. ज्याची किंमत ५० रुपयांपेक्षा कमी आहे. यात युजर्संना जास्त फायदा मिळतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील Reliance Jio, Airtel, Vodafone आणि BSNL च्या प्लान्ससंबंधी ही खास माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः रिलायन्स जिओचे प्लान ११ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना १ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता युजरच्या सध्याच्या प्लान इतकी असणार आहे. २१ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता युजरच्या सध्याच्या प्लान इतकी असणार आहे. एअरटेलचे प्लान १९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २ दिवसांची वैधता दिली जाते. यात २०० एमबी डेटा दिला जातो. सोबत ट्रूली अनलिमिटेड कॉल्स म्हणजेच कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा दिली जाते. ४५ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. ४८ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा सोबत २८ दिवसांची वैधता दिली जाते. ४९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३८.५२ रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. सोबत १०० एमबीचे डेटा आणि २८ दिवसांची वैधता दिली जाते. वाचाः वोडाफोन आयडियाचे प्लान १६ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना १ जीबी डेटा २४ तासांसाठी दिला जातो. १९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २ दिवसांची वैधता दिली जाते. सोबत २०० एमबी डेटा दिला जातो. सोबत ट्र्रली अनलिमिटेड कॉल्स कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग दिली जाते. ३९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३० रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. सोबत १०० एमबीचा डेटा दिला जातो. या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. ४८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधतेसोबत ३ जीबी डेटा दिला जातो. ४९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३८ रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. सोबत १०० एमबी डेटा दिला जातो. २०० एमबी अतिरिक्त डेटा दिला जातो. एकूण मिळून या प्लानमध्ये ३०० एमबी डेटा दिला जातो. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. बीएसएनएलचे प्लान कंपनीने नुकतीच एफआरसी ४७ लाँच केला आहे. या प्लान अंतर्गत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. युजर्संना रोमिंग, एसटीडी आणि लोकल कॉल मिळते. सोबत १४ जीबी डेटा दिला जातो. १०० एसएमएस रोज दिले जातात. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. हा प्लान चेन्नई आणि तामिळनाडू मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच याला दुसऱ्या सर्कलमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. ४९ रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्संना २ जीबी डेटा दिला जातो. सोबत कॉलिंगसाठी १०० मिनिट्स दिले जातात. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kaJjk4