मुंबई- सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी करिना कपूरने आपल्या दुसर्या मुलाला जन्म दिला. यापूर्वी सैफ आणि करिनाचा मोठा मुलगा पापाराझीचा आवडता स्टारकिड होता. आता जर सैफिनाचा दुसरा मुलगादेखील तैमूरसारखाच प्रत्येकाचा आवडता स्टारकिड झाला तर त्यात काही नवल नसेल. सर्वांना सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहायची इच्छा आहे. दरम्यान, तैमूरचा धाकटा भाऊ कसा दिसतो हे आजोबा यांनी सांगितलं आहे. सोमवारी सकाळी रणधीर कपूर आपल्या मुलीला आणि नातवाला पाहण्यासाठी ब्रीच कॅण्डी इस्पितळात गेले होते. यानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी करिनाचा दुसरा मुलगा कसा दिसतो ते सांगितलं. रणधीर यांना विचारण्यात आलं की नवजात बालक करिनासारखा दिसतो की सैफसारखा? यावर उत्तर देताना रणधीर म्हणाले की, 'मला तर सगळी मुलं सारखीच वाटतात.' पण तरीही थोडा आग्रह धरल्यावर ते म्हणाले की, 'तसं, तिथे प्रत्येकजण म्हणत होते की तो (करिनाचा लहान मुलगा) आपल्या मोठ्या भावासारखा तैमूरसारखा दिसत आहे.' दरम्यान, इस्पितळात पोहोचण्यापूर्वी रणधीर यांनी सांगितलं की, 'तैमुर मोठा भाऊ झाल्याच्या आनंदात आहे. याशिवाय मीही फार आनंदी आहे. एवढा आनंदी आहे की सध्या चंद्रावर पोहोचल्याचा आनंद होत आहे. माझ्या नातवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी प्रार्थना करतो.' लॉकडाउनमध्ये करिनाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. करिना आणि सैफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'आमच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आर्शीवादासाठी खूप आभार.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sfJq0K