नवी दिल्लीः मोटोरोला लवकरच भारतात ई सीरीज अंतर्गत आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करू शकतो. फोनला ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS ने सर्टिफाय केले आहे. त्यामुळे आता भारतात या फोनची लाँचिंग कन्फर्म झाली आहे. फोनला मिळालेल्या बीआयएस सर्टिफिकेशनची माहिती टिप्स्टर मुकुल शर्माने दिली आहे. भारतात याचे मॉडल नंबर XT2097-16 असणार असल्याचे सांगितले. वाचाः Moto E7i Power चे मॉडल नंबर XT2097-15 ला ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशनवर लेनोवो K13 च्या मॉनिकर सोबत पाहिले गेले होते. त्यामुले असे मानले जात आहे की, मोटोच्या या फोनला चीनसह काही अन्य देशात लेनोवा के १३ म्हणून लाँच करू शकते. वाचाः Moto E7iचे फीचर्स ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 1600x720 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी या फोनला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लाँच करू शकते. फोनला मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट सोबत लाँच करू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमधील बॅटरी संदर्भात अद्याप काही माहिती समोर आली नाही. चार्जिंग साठी यात यूएसबी टाइप सी पोर्ट दिला जाणार आहे. वाचाः १९ फेब्रुवारीला होणार लाँच मोटोरोला आपला बजेट स्मार्टफोन ई७ पॉवरला १९ फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. फोनला ४ जीबी रॅम LPDDR4X RAM सोबत मीडियाटेक हीलियो P22 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलेल्या मायक्रोसाइटच्या माहितीनुसार, या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qD9Wkk