Full Width(True/False)

प्रभासच्या काही मिनिटांच्या सीनसाठी केला गेला कोट्यवधींचा खर्च, वाचा त्यात काय आहे खास

मुंबई: बाहुबली फेम अभिनेता लवकरच '' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार आहे. नेहमीच अॅक्शन आणि स्टंट हिरोच्या भूमिकेत दिसणारा प्रभास या चित्रपटात मात्र एक रोमँटिक हिरो साकारत आहे. त्यामुळेच सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. त्यानंतर चित्रपटाशी संबंधीत अनेक खुलासे सध्या होताना दिसत आहेत. 'राधे श्याम' या बिग बजेट चित्रपटाकडून प्रभास आणि त्याच्या टीमला बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे या चित्रपटाती लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या सर्वच गोष्टींवर अगदी काटोकोरपण लक्ष दिलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या कॉस्ट्यूमसाठी निर्मात्यांनी ६ कोटींचा खर्च केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता चर्चा आहे ती चित्रपटातील एका सीनची. या काही मिनिटांच्या सीनसाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 'राधे श्याम'मधील या काही मिनिटांच्या सीनसाठी जवळपास १.५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. हा सीन खरंतर रोम शहरातील आहे पण याचं शूटिंग मात्र भारतात केलं गेलं आहे. त्यामुळे हा संपूर्ण सेट भारतात तयार करण्यात आला आणि त्यातील प्रत्येक गोष्ट खरी वाटावी याची पूर्ण काळजी टीमनं घेतली आहे. पण काही मिनिटांच्या या सीनसाठी रोम शहरच भारतात वसवण्यात आलं आणि हीच या चित्रपटातील खूप खास गोष्ट आहे. यासाठी टीमनं खूप मेहनत घेतली असून यासाठी जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. 'राधे श्याम'मध्ये प्रभासचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट ३५० कोटी रुपये एवढं असल्याचं बोललं जात आहे. प्रभासच्या बहुचर्चित 'राधे श्याम' या चित्रपटाचं दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या व्यतिरिक्त सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोन्डा, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा क्षेत्री, सत्यन अशा मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग हैदराबाद, इटली आणि जॉर्जिया या ठिकाणी झालं आहे. हा चित्रपट हिंदी, तमिल, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3avL4Fl