नवी दिल्लीः चीनमधील शांघाय येथे २३ फेब्रुवारी पासून मोबाइल वर्ल्ड काँग्रेसची सुरुवात होत आहे. या टेक इव्हेंटमध्ये रियलमी ४ मार्चला लाँच होणाऱ्या आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन ला शोकेस करणार आहे. या दरम्यान, कंपनीने या अपकमिंग स्मार्टफोनचे दोन पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये फोनची रियर डिझाइनला पाहिले जाऊ शकते. पोस्टरनुसार, या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. वाचाः पंचहोल डिझाइन डिस्प्ले मिळणार या फोनचे मॉडल नंबर RMX2202 आहे. नुकत्याच आलेल्या TENAA आणि 3C सर्टिफिकेशन वेबसाइटच्या माहितीनुसार, या मॉडल नंबरच्या डिव्हाइसला कंपनी चीनमध्ये रियलमी GT 5G च्या नावाने लाँच करणार आहे. TENAA लिस्टिंगमध्ये हा फोन पंचहोल डिझाइन डिस्प्ले, रॅक्टांगल कॅमेरा मॉड्यूल सोबत दिसत आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या रियर पॅनेलवर जीटीची बेजिंग सुद्धा दिली आहे. वाचाः लेदर आणि ग्लास ब्लॅक एडिशन असू शकतो कंपनी या फोनला चीनमध्ये लेदर आणि ग्लास ब्लॅक एडिशनमध्ये लाँच करू शकते. कंपनीने जे पोस्टर रिलीज केले आहे. त्या फोनच्या ग्लास एडिशन व्हेरियंटला पाहिले जाऊ शकते. या अधिकृत पोस्टरमध्ये जीटीची बेजिंग दिसत नाही. फोनची डिझाइन टेनावर पाहिले गेलेली सारखी आहे. फोनच्या खालील भागात लाउडस्पीकर, एक यूएसबी सी पोर्ट आणि एक ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे. वाचाः 120Hz रिफ्रेश रेट आणि SD888 प्रोसेसर लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रियलमी जीटी मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटचा AMOLED स्क्रीन मिळणार आहे. फोनला १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीच्या UFS 3.1 स्टोरेज सोबत येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट ऑफर करू शकते. हा फोन ६५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येऊ शकते. कंपनी या फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड रियलमी यूआय ३.१ देऊ शकते. वाचाः प्रो व्हर्जनची सुद्धा होऊ शकते एन्ट्री रियलमी या फोनचे एक प्रो व्हर्जन सुद्धा लाँच करू शकते. यात 160Hz च्या रिफ्रेश रेट सोबत स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये १२५ वॉटचे अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंग दिला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Mb2f5G