Full Width(True/False)

Realme च्या स्मार्टफोनवर ७ हजारांपर्यंत सूट, आज रात्री १२ पर्यंत खरेदीची संधी

नवी दिल्लीः जर तुम्हाला बेस्ट डील आणि ऑफर मध्ये रियलमीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज तुमच्याकडे अखेरची संधी आहे. फ्लिपकार्टवर १५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या रियलमी डेजचा आज रात्री १२ वाजेपर्यंत सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये कंपनी आपल्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर ७ हजारांपर्यंत सूट देत आहे. जाणून घ्या ऑफर्स संबंधी सविस्तर... वाचाः रियलमी X50 प्रो 5G रियलमीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनला तुम्ही ७ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. फोनवर सूट दिल्यानंतर याची किंमत ४१ हजार ९९९ रुपयांऐवजी ३४ हजार ९९९ रुपये झाली आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि ६५ वॉट फास्ट चार्जिंग सुपर डार्ट चार्जिंग सोबत ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः रियलमी नार्जो 20 प्रो या सेलमध्ये या फोनला तुम्ही १६ हजार ९९९ रुपयांच्या किंमती ऐवजी १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या डिस्काउंटमध्ये १ हजार रुपयांचा एक्सचेंज प्रीपेड ऑफचा समावेश आहे. नार्जो सीरीजच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट सुपरडार्ट चार्ज ऑफर करते. वाचाः रियलमी 7 ८ जीबी पर्यंत रॅम सोबत येणाऱ्या या फोनला या सेलमध्ये १३ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः रियलमी C11 रियलमी डेज सेलच्या अखेरच्या दिवसामध्ये या फोनला सूटनंतर ८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीऐवजी केवळ ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. फोनच्या किंमतीत ५०० रुपयांचा डिस्काउंट सुद्धा दिला आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qyMVi9