Full Width(True/False)

Samsung Galaxy A12 स्मार्टफोन क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः स्मार्टफोनला भारतात कंपनीच्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत लेटेस्ट मॉडल म्हणून लाँच करण्यात आले आहे. या फोनला गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी ए ११ चे अपग्रेड म्हणून लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची इंडियन मार्केटमध्ये Redmi Note 9 Pro, Realme 7 आणि Oppo A52 या स्मार्टफोनशी टक्कर पाहायला मिळणार आहे. वाचाः Samsung Galaxy A12 स्मार्टफोनला दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. भारतात या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. या फोनला ब्लॅक, ब्लू, आणि पांढऱ्या रंगाच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध केले आहे. या फोनची विक्री १७ फेब्रुवारी पासून रिटेल स्टोर्स, सॅमसंगची अधिकृत वेबसाइट आणि अन्य प्रमुख ऑनलाइन पोर्ट्ल्सवरून केली जाणार आहे. वाचाः लाँच ऑफर्समध्ये या फोनला ३४९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर ग्राहकांना ३ हजार रुपयांचा व्हॅल्यू इंस्टेंट कॅशबॅक मिळणार आहे. तसेत पार्टनर्सकडून ४ हजार रुपयांचे वाउचर्स सुद्धा मिळणार आहेत. या ऑफरचा लाभ नवीन आणु जुन्या दोन्ही ग्राहकांना मिळणार आहे. तर वोडाफोन आयडिया ग्राहकांना २९९ रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा बेनिफिट मिळणार आहे. हा फोन झीरो डाउनपेमेंट ईएमआय ऑफर्स सह उपलब्ध केला जाणार आहे. या फोनला ड्यूअल सिम सपोर्ट दिला असून हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड वन यूआय कोर २.५ वर काम करतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. सेटअपचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये इंटरनल स्टोरेज १२८ जीबी पर्यंत दिला आहे. कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qu6Cb5