Full Width(True/False)

रिहानाने टॉपलेस फोटोशूटमध्ये घातलं गणपतीचं पेंडन्ट, भडकली विहिंप

मुंबई- पॉप गायिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने टॉपलेस फोटोशूटमध्ये गळ्यात गणपतीचं पेंडन्ट घातलं होतं. नेमकी हीच गोष्ट अनेकांना आवडली नाही. यासंबंधी विश्व हिंदू परिषदे ने दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडेकडे ट्विटरच्या सीईओविरोधात तक्रार दाखल केल्याचं वृत्त आहे. विहिंपच्या म्हणण्यानुसार, रिहानाने असा फोटो ट्वीट करून हिंदूंच्या भावना भडकवल्या आहेत. रिहानाचं ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विहिंपने ट्विटर आणि फेसबुकविरूद्ध केली तक्रार रिहानाने नुकतेच एका ब्रँडसाठी टॉपलेस फोटोशूट केलं. या टॉपलेस फोटोत रिहानाच्या गळ्याभोवती हिंदू देवता गणपतीचं पेंडन्ट होतं. याविरुद्धच लोकांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की ट्विटर आणि फेसबुकसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे हिंदुविरोधी कार्यांचं माध्यम बनलं आहे. ट्विटर आणि फेसबुक या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, म्हणून आम्ही या दोन्ही माध्यमांच्या सीईओविरोधात मुंबई आणि दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. आयटी मंत्रालयाकडे तक्रार, खातं निलंबित करण्याची मागणी विनोद पुढे म्हणाले की, आयटी मंत्रालयाकडे यासंबंधी कारवाई करण्याची विनंती केली गेली आहे. तसंच रिहानाचं ट्विटर हँडल निलंबित करण्याची मागणीही केली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर हिंदुविरोधी कारवाया थांबवल्या गेल्या नाहीत तर त्यावर बहिष्कार टाकला जाईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NblGf6