Full Width(True/False)

Vi ची ऑफर, रात्री १२ वाजेपासून सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड हाय स्पीड डेटा

नवी दिल्लीः Vi () आपल्या प्रीपेड युजर्संना रात्री अनलिमिटेड हाय स्पीड डेटा देत आहे. कंपनीची ही ऑफर २४९ रुपयांच्या किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या प्लानवर आहे. या रिचार्जवर तुम्हाला रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा मिळू शकतो. वेब ब्राउजिंग आणि ओटीटी माध्यमातून डेटा कलेक्ट करता येऊ शकतो. वाचाः Vi प्रीपेड ग्राहकांना या ऑफर सोबत रात्री १२ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड हाय स्पीड डेटाचा मस्त वापर करता येऊ शकतो. याची घोषणा स्वतः टेलिकॉम कंपनीने केली आहे. व्हीआयच्या सध्याच्या व नवीन दोन्ही ग्राहकांना या ऑफरचा फायदा मिळू शकतो. २४९ रुपयांच्या किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांच्या प्लानवर ही ऑफर कंपनी देत आहे. ग्राहकांना आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लानसोबत डेटा रोलओवर बेनिफिट सुद्धा मिळू शकते. या अंतर्गत वोडाफोन आयडिया ग्राहक सोमवार ते शुक्रवार पर्यंत वाचलेला डेटा शनिवार आणि रविवार वापरू शकतात. वाचाः करोना व्हायरस महामारी दरम्याना लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे वेब ब्राउजिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉन्टेंट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. Ookla च्या डाटानुसार, Vi ची सर्वात वेगवान 4जी डाउनलोड आणि अपलोड स्पीड आहे. २०२० वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे १३.७४ Mbps आणि ६.१९ Mbps होती. Airtel या यादीत दुसऱ्या नंबरवर होते. याची डाउनलोड स्पीड १३.५८ Mbps आणि अपलोड स्पीड ४.१५ Mbps होती. Jio ९.७१ Mbps आणि ३.४१ Mbps डाउनलोड व अपलोड स्पीड सोबत तिसऱ्या नंबरवर होती. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b9eacK