Full Width(True/False)

VIDEO: 'फास्टॅग झाला स्लोटॅग'; गायक संदीप खरे यांना फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’च्या सक्तीला जेमतेम दोन-तीन दिवस होत नाहीत, तोच त्यातील फोलपणा उघड व्हायला लागला आहे. प्रसिद्ध कवी आणि गीतकार यांच्याकडून कोल्हापूर-पुणे प्रवासात ‘फास्टॅग’चा स्टीकर स्कॅन होत नाही, असे कारण देत दुप्पट शुल्क वसूल करण्याचा प्रयत्न झाला; पण खरे यांनी सुरू असल्याने तोच स्कॅन करावा, असा आग्रह धरला. अखेरीस, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वेगळ्या मशिनने स्टीकर स्कॅन केला आणि टोलचे पैसे जमा झाले. हा सर्व प्रकार खरे यांनी सोशल मीडियावर टाकल्यावर अशाच स्वरूपाची घटना आमच्याबाबत घडल्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच जणांनी दिल्या आहेत; तसेच ही व्यवस्था अधिक पारदर्शी करावी, अशी मागणी केली आहे. संपूर्ण देशात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून टोलनाक्यांवर फास्टॅग सक्तीचा करण्यात आला आहे. फास्टॅग नसल्यास टोलच्या दुप्पट रक्कम वसूल केली जात आहे. मात्र, अनेकदा फास्टॅगच्या अकाउंटला आवश्यक रक्कम जमा असतानाही केवळ स्टीकर स्कॅन होत नाही म्हणून दुप्पट दंड आकारला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध कवी संदीप खरे यांना गुरुवारी सकाळी कोल्हापूर-पुणे प्रवासात किणी टोलनाक्यावर हा अनुभव आला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला त्यांनी ही संपूर्ण घटना सांगितली. त्यांच्या गाडीचा स्टीकर स्कॅन होत नाही त्यामुळे तुम्ही टोलच्या ७५ रुपयांऐवजी दीडशे रुपये भरा, अशी मागणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, फास्टॅगच्या खात्यात पुरेशी रक्कम असल्याने मी दुप्पट रक्कम भरणार नाही, अशी भूमिका खरे यांनी घेतली. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धट आणि अरेरावीच्या स्वरूपात वाद घातला. तसेच, कशावरून तुमच्या खात्यात रक्कम आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी खरे यांनी काही दिवसांपूर्वीच टोलनाक्यावरून गेल्यानंतर फास्टॅगची रक्कम वजा झाल्यानंतर राहिलेल्या रकमेचा तपशील असलेला एसएमएस संबंधित कर्मचाऱ्यांना दाखविला. या दरम्यान टोलनाक्यावरील वरिष्ठ अधिकारी तेथे दाखल झाले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुसऱ्या मशिनच्या माध्यमातून फास्टॅग स्कॅन करण्यास सांगितले असता, त्यातून टोलची रक्कम लगेच वजा झाली. त्यामुळे या वादावर पडदा पडला असला, तरी खरे यांनी सोशल मीडियावर त्याबाबतचा व्हिडिओ टाकून नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या व्हिडिओवर अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आमच्याबाबत असाच प्रकार घडल्याचे नमूद करत यंत्रणेत अधिक सुधारणा केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाहा व्हिडिओ: गडकरी दखल घेणार का?केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सगळीकडे त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, त्यात अजूनही काही त्रुटी असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खरे यांनी सोशल मीडियावर टाकल्याने त्याला प्रतिसाद मिळत असला, तरी सर्वसामान्य नागरिकांकडून फास्टॅग स्कॅन होत नाही म्हणून दुप्पट दंड आकारण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या प्रकाराची दखल गडकरी घेणार का आणि फास्टॅग स्कॅन होत नाही म्हणून दुप्पट दंड करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, अशी विचारणा केली जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3shlNoD