Full Width(True/False)

तुला काय माहीत आहे? सुशांतच्या चाहत्याला हायकोर्टाचा प्रश्न

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा अचानक झालेला मृत्यू संपूर्ण बॉलिवूडसाठी एक धक्का होता. त्याचे चाहते अजूनही त्याच्या मृत्यूबाबत साशंक आहेत. त्याला न्याय मिळावा यासाठी अजूनही ते प्रयत्नशील आहेत. सुशांतच्या मृत्यूचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. तरीही त्याच्यावरील त्याच्या चाहत्यांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. वकील अशोक सरोगी यांच्या पत्नी सरला सरोगी आणि राहुल शर्मा यांच्या प्रोडक्शन हाऊसने सुशांतच्या आयुष्यावर 'न्याय: द जस्टीस' या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली होती. त्यावर सुशांतच्या एका चाहत्याने अनेक प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने 'सामाजिक कार्यकर्ता' असलेल्या सुशांतच्या चाहत्याला काही प्रश्न विचारले जे या चित्रपटाशी संबंधीत होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रश्न विचारताना म्हटले, ''न्याय: द जस्टीस' बाबतीत तुला कितपत माहिती आहे? कशाबद्दल तुला काय माहीत आहे?' उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला की, 'या चित्रपटात काय दाखवण्यात येणार आहे हे तुला कसं माहीत?' २२ डिसेंबर २०२० रोजी मनीष मिश्रा या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, हा चित्रपट सुशांतच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकतो आणि हा चित्रपट काही खोट्या आणि विकृत घटनांवर आधारित आहे. परंतु, आता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती चव्हाण यांनी याचिकाकर्त्याच्या वैयक्तिक हेतूवर प्रश्न उपस्थित केले. या चित्रपटात सुशांतची भूमिका अभिनेता जुबेर खान साकारणार असून अभिनेत्री श्रेया शुक्ला ही रिया चक्रवर्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NaeBM6