नवी दिल्लीः पोर्टेबल आणि इनोवेटिव ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स बाजारात प्रमुख कंपनी पोर्ट्रोनिक्स ने होळीला डोळ्यासमोर ठेऊन ३० वॉटची आपले नवीन मोठे ब्लूटूथ स्पीकर लाँच केले आहे. पोर्ट्रोनिक्सच्या या स्पीकरला साउंडड्रम एल नाव दिले आहे. ज्यात ५.० ब्लूटूथ दिले आहे. एक्स्ट्रा कनेक्टिविटीसाठी स्पीकर मध्ये ३.५ मिमी ऑक्स (AUX) आणि नॉन-ब्लूटूथ पर्यायासाठी पेनड्राइव्ह (Pendrive) चा सपोर्ट दिला आहे. वाचाः साउंडड्रम एल एक सिलेंडर स्टाइलचा आहे. याचा फायदा हा आहे की, घरात कोणत्याही कोपऱ्यात आरामात ठेवला जाऊ शकतो. साउंडड्रम एल एक यूनीक इक्विलाइजर बटन देण्यात आले आहेत. युजर्संना बास आणि टेरिबल स्तरांवर कंट्रोल करण्यास मदत मिळते. बासला वाढवण्यासाठी इक्विलाइजर बटनला टॅप करावे लागेल. आणि टेरिबलला वाढवण्यासाठी पुन्हा टॅप करावे लागणार आहे. पोर्ट्रोनिक्स साउंडड्रम एल स्पीकरची बॅटरीला ६ तासांची बॅकअपचा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, याची बिल्ड क्वॉलिटी जबरदस्त आहे. याच्या बॉडीत हाय क्वॉलिटी मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. या स्पीकरला वॉटर आणि डस्टप्रूफ साठी आयपीएक्स6 (IPX6) ची रेटिंग मिळाली आहे. वाचाः या स्पीकरचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात दुसऱ्या स्पीकरने कनेक्ट करता येऊ शकते. साउंडड्रम एक वर्षाची वॉरंटी सोबत येते. याची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवरून ३ हजार ५९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cdQHcb