मुंब ई- बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक असणारे यांची मुलगी श्रद्धा कपूरचा आज ४ मार्च रोजी वाढदिवस आहे. श्रद्धाने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली. वडिलांच्या नावाचा आधार न घेता तिने स्वतः बॉलिवूडमध्ये तिचं अस्तित्व उभं केलं. आजपर्यंत श्रद्धाने अनेक हिट चित्रपटात काम केलं. प्रेक्षकांनीही तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. अभिनयासोबत नृत्यकौशल्यातही पारंगत असणाऱ्या श्रद्धाने आज वयाची ३४ वर्ष पूर्ण केली आहेत. ती सध्या मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा मालदीवला तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी गेली आहे. तिथले अनेक फोटोही तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलेत. तिच्या वाढदिवसादिवशी श्रद्धाने शक्ती कपूर यांच्याकडून एका खास गोष्टीची मागणी केली. तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तिने वडिलांना तिची एक इच्छा बोलून दाखवली. तिने शक्ती यांच्याकडे सिगारेट न ओढण्याची मागणी केलीये. तिच्यासाठी वडिलांनी धूम्रपान करणं सोडावं हेचं तिचं वाढदिवसाचं गिफ्ट असेल, असं ती म्हणाली. यावर शक्ती यांनी तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवली आहे. लेकीने हे गिफ्ट मागितल्यावर शक्ती थोडेसे पेचात पडले आहेत. त्यांच्या मते, ते मुलींसाठी काहीही करू शकतात. परंतु, इतक्या वर्षाची जुनी सवय अशी अचानक सोडणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेली कित्येक वर्ष ते हे व्यसन करत असल्याने एका झटक्यात ते सोडणं त्यांना शक्य होईल का, याचा विचार ते करत आहेत. पण, मुलीवरील प्रेमासाठी ही वाईट सवय सोडण्याचा ते नक्की प्रयत्न करणार आहेत. श्रद्धा ही देवाने मला दिलेली एक सुंदर भेट आहे. तिचं मन अत्यंत निर्मळ असून तिच्यासारखी मुलगी मला मिळाली, हेच माझं भाग्य असल्याची भावना शक्ती यांनी व्यक्त केलीये. मी कधीही तिला कोणत्याही गोष्टीसाठी अडवत नाही. आमच्या काळी २० वर्षातच लग्न होत होती. परंतु आता काळ बदलला आहे, तिच्या प्रत्येक निर्णयात माझा पाठिंबा आहे, असं त्यांनी सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uIZk5E