नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनीकडून सांगण्यात येत आहे की, भारतात ५ जी नेटवर्कला तीन महिन्यात काही लिमिटेड जागी लाँच केले जाऊ शकते. कारण, ऑप्टिकल फायबर आधारित इंफ्रास्टक्चर आता पूर्णपणे तयार आहे. नोकिया इंडियाचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट चे प्रमुख अमित मारवाह यांनी म्हटले की, भारतात ५ जी सर्विसला लाँच करण्याचा निर्णय करावा लागणार आहे. अन्यथा नेक्स्ट जनरेशनची टेक्नोलॉजीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. वाचाः पीटीआयच्या रिपोर्टनुसार, अमित मारवाह यांनी पुढे असेही सांगितले की, जर आपण ५ जी लवकरात लवकरच इनेबल केले नाही तर आपण ही संधी गमावू शकतो. ५जी ऑपरेटरांसाठी पैसा बनवण्याचे कोणतेही साधन नाही. भारत आणि जगात नवीन आर्थिक मूल्य बनवण्याची ही वेळ आहे. आम्ही भारतात ५ जीचे निर्माण करीत आहोत. यासाठी हार्डवेयर सुद्धा तयार आहे. त्यामुळे आम्ही भारतात पुढील ३ महिन्यात ५ जी नेटवर्कला डिप्लॉय करण्यासाठी काम करू शकतो. नोकिया चेन्नई प्लांटमधून जगाच्या अन्य भागात ५जी उपकरणला एक्सपोर्ट करीत आहे. याच्या भागीदारीसाठी प्रोडक्शन लिंक्ड इंसेटिव योजना बनवत आहे. वाचाः टेलिकॉम एक्सपर्ट प्रमोशन काउंसिलचे चेयरमन संदीप अग्रवाल यांनी लोकल स्तरावर मॅन्यूफॅक्चर होणारे गियर्सचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच सुरक्षेसाठी नियंत्रण भारताकडे असायला हवा. ५जी सर्विसेजचे समर्थन करण्यासाठी ऑप्टिकल फायबर बेस इन्फ्रास्ट्रक्चर केवळ काही निवडक क्षेत्रात उपलब्ध आहे. त्यामुळे या टेक्नोलॉजीला काही निवडक क्षेत्रात रोलआउट केले जाऊ शकते. वाचाः संदीप अग्रवाल यांनी म्हटले की या टेक्नोलॉजीला भारतात विकसित करणे महाग आहे. तर चीनने आपल्या स्थानिक कंपन्याला नवीन टेक्नोलॉजीसाठी जवळपास २०० बिलियन अमेरिकन डॉलरची रक्कम दिली आहे. Nasscom कार्यकारी परिषद चे सदस्य आणि टेक महिंद्राचे मुख्य रणनिती अधिकारी जगदीश मित्रा यांनी म्हटले की, कोविड १९ महामारी ने सर्व देशांना झोपेतून जागे केले आहे. भारतीय मार्केट आधीपासूनच मोठ्या संधीत आहे. त्यामुळे त्याला नजरेआड केले जाऊ शकत नाही. मेड इन इंडिया प्रोडक्ट, भारत हून एक्सपोर्ट करणे आदी चांगले पर्याय होऊ शकतात. यासाठी आपल्याला सर्वांना केवळ कौशल्य आधारित असणे गरजेचे नाही तर ज्या ठिकाणी आपण निर्माण आणि इनोवेशन करू शकू. वाचाः टेलिकॉम सेक्टर स्किल काउंसील अरविंद बाली यांनी म्हटले की, केवळ एक देश पूर्णपणे टेक्नोलॉजीला बनवू शकत नाही. त्यांना दुसऱ्या देशाची मदत घ्यावी लागू शकते. पीएलआय स्कीम लोकांना आत्मनिर्भर बनवणे आणि रोजगार उत्पन्न करणे हे योग्य पाऊल आहे. टेलिकॉम हार्टवेयर मध्ये पीएलआय सोबत मिळून हा अंदाज लावला जाऊ शकतो की, भरतात १० लाख नोकरी निर्माण केले जातील. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38w5FYR