म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या एकूण २७ सर्व्हरवर अज्ञात हॅकरने केला. ‘स्मार्ट सिटी’च्या सर्व्हरवर ‘रॅन्समवेअर’ने हल्ला करून, सर्व्हरमधील सर्व फाइल हल्लेखोरांनी ‘इनक्रिप्ट’ (मूळ स्वरूप बदलले) केल्या. या फाइल डिक्रिप्ट (मूळ स्वरूपात) करून हव्या असल्यास ‘बिटकॉइन’ स्वरूपात खंडणीची मागणीही सायबर हल्लेखोरांनी केली. या हल्ल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’चे काम पाहणाऱ्या कंपनीचे पाच कोटींचे नुकसान झाले आहे. वाचाः पिंपरी चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातंर्गत निगडी येथील व्यापारी संकुल येथे मे. टेक महिन्द्रा लि. आणि त्यांच्या भागीदारामार्फत ‘इंटिग्रेटेड कमांड कॅट्रोल सेंटर अँड डेटा सेंटर’ तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ मिशन (पॅनसिटी) प्रकल्पांतर्गात सिटी नेटवर्क, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सिवरेज, स्मार्ट ट्रॅफिक, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट एन्हार्नमेंट, सिटी सर्व्हायलन्स आदी कामकाजाचा समावेश आहे. हा सर्व डेटा तेथे एकत्रित होणार आहे. त्या संदर्भातील सर्व काम मे. टेक महिन्द्रा लि. या कंपनीला दिली आहेत. मात्र, २६ फेब्रुवारीला या सेंटरवर सकाळी अज्ञातांकडून सायबर हल्ला झाला. त्यामध्ये डेटा सेंटरमधील एकूण २७ सर्व्हर ‘इन्फेक्टेड’ झाले. या प्रकरणी मे. टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी (वय ५५, रा. अमनोरा पार्क टाउन, हडपसर) यांनी मंगळवारी (९ मार्च) फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचाः दरम्यान, ‘डेटाबेस’च्या कामासाठी लागलेला वेळ, गुंतवणूक आणि मनुष्यबळ असा सर्व हिशेब करून या घटनेत पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला. कसा झाला सायबर हल्ला? - हॅकरने सर्वप्रथम रेकी केली. - ऑनलाइन सिस्टिममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. - पूर्णपणे सिस्टीममध्ये घुसल्याची खात्री केली. - सर्व्हरमधील वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व फाइल ‘डॉट बिंजो’ या फॉन्टमध्ये कन्व्हर्ट केल्या. - या फाइल्स पूर्ववत करण्याची की तयार करून, ‘बिटकॉइन’च्या माध्यमातून खंडणी मागितली. वाचाः काय काळजी घ्याल? ज्या आस्थापना किंवा व्यक्तीकडील डेटाला किंमत असते अशा डेटावर सायबर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. एक्सेस कंट्रोल वाढविणे, अँटी व्हायरस ठेवणे, लिमिटेड अॅक्सेस ठेवणे, अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंक न उघडणे अशा प्रकारे आपण आपल्या डेटाची काळजी घेऊ शकतो. सायबर हल्ला परदेशातून झाला आहे की देशातून याचा तपास सुरू आहे. संबंधित कंपनीला त्यांच्या फाइल पूर्ववत करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सुरक्षिततेत राहिलेल्या काही त्रुटींचा गैरफायदा घेऊन हॅकर असे हल्ले करातत. हल्ले टाळण्यासाठी सिस्टिमची, सर्व्हरची जास्तीत जास्त सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. - संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l97ShN