Full Width(True/False)

6000mAh बॅटरी आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्टचा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत ६९९९ ₹

नवी दिल्लीः स्वस्त किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओनी कंपनीने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनला भारतात लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा दिला आहे. वाचाः Gionee Max Pro ला ई-कॉमर्स फ्लिपकार्टवर लाँच करण्यात आले आहे. या फोनची विक्री ८ मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे. भारतात याची किंमत सिंगल व्हेरियंट ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजसाठी ६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. या फोनला ब्लॅक, ब्लू, आणि रेड या तीन कलर पर्यायात बाजारात उतरवले आहे. ड्यूअल सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड १० दिला आहे. या फोनमध्ये २.५ डी कर्व्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्शन दिला आहे. या फोनमध्ये ६.५२ इंचाचाच फुल व्ह्यू ड्यू ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. यात ३ जीबी रॅम सोबत ऑक्टा कोर यूनिसोक ९८६३ ए प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर मध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. तसेच यात २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Gionee Max Pro च्या इंटरनल मेमरी ३२ जीबी ची आहे. कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत याचे स्टोरेज वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत मोठी 6000mAh बॅटरी दिली आहे. तसेच रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग साठी मायक्रो यूएसबी पोर्टचा सपोर्ट दिला आहे. तसेच डेडिकेटेड गुगल असिस्टेंट बटन आणि अनलॉक सपोर्ट फीचर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uNHsXx