Full Width(True/False)

'माझे वडील मशिदीत गाणी गायला जायचे', प्रियांकाच्या वक्तव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मुंबई- बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री एका मुलाखतीत भारतातील धार्मिकतेवर वक्तव्य केलं होतं. तिने भारतातील संस्कृतीचं आणि धर्मांचं महत्व सांगितलं होतं. धर्माला भारतीयांपासून वेगळं करू शकत नाही. धर्म हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं तिने म्हटलं होतं. त्यासोबत तिने तिच्या आयुष्यावर हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असल्याचं म्हटलं. प्रियांकाच्या या वक्तव्यावर तिला अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. हॉलिवूडच्या प्रसिद्ध लेखिका, निवेदक आणि अभिनेत्री असलेल्या विनफ्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रियांकाने या गोष्टीचा खुलासा केला होता. तिने म्हटलं होतं की, ती कॉन्व्हेण्ट शाळेत शिकली त्यामुळे तिला ख्रिश्चन धर्माबद्दल माहिती आहे. हिंदू धर्मात जन्मल्यामुळे तिला हिंदूंच्या परंपरा माहिती आहेत. प्रियांकाच्या बालपणी तिचे वडील घराजवळील मशिदीमध्ये गाणं गाण्यासाठी जायचे त्यामुळे तिच्यावर इस्लाम धर्माचादेखील प्रभाव आहे. प्रियांकाच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. युजर्सनी म्हटलं, 'काय? तिने म्हटलं की तिचे वडील मशिदीमध्ये गायचे?' एका दुसऱ्या युजरने लिहिलं, 'मशिदीत गाण्याची परवानगी असते? मला तर माहितंच नव्हतं.' एका युजरने लिहिलं, 'तू तुझ्या बहिणीच्या स्ट्रगल बद्दल काही सांगशील का?' तर दुसऱ्या युजरने खिल्ली उडवत म्हटलं, 'प्रियांकाचे वडील मशिदीत गाणं गायचे. कृपया मला त्या नाव मशिदीचं सांगा.' प्रियांकाच्या चाहत्यांनी यावर तिची पाठराखणही केली आहे. त्यांनी तिची बाजू मांडत लिहिलं, 'तिला मशिद नाही तर दर्गा म्हणायचं असेल पण इंग्रजीमध्ये सांगताना तिने तसं म्हटलं. यावर इतकं गोंधळून जायची गरज नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cU1abH