मुंबई: बॉलिवूडमध्ये घराणेशाही एक असा मुद्दा बनला आहे. ज्यावरून मागच्या बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. आता लोक यावर मोकळेपणानं बोलताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना बाहेरून आलेल्या कलाकारांपेक्षा जास्त संधी मिळतात आणि बाहेरुन आलेल्या कलाकारांच्या कौशल्याकडे दुर्लक्ष केलं जात असा आरोप मागच्या बऱ्याच काळापासून होताना दिसत आहे. याच घराणेशाहीच्या वादावर आता अभिनेता सूरज पंचोलीनं आपली मत मांडलं आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं हे सर्वांसाठीच कठिण काम आहे असं सूरजचं म्हणणं आहे. नुकत्याच एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडच्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना सूरज म्हणाला, 'हे कोणासाठी सोप्पं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. फक्त उत्तम अभिनय असलेलीच व्यक्ती बॉलिवूड टिकून राहू शकते. बाकी कोणीच या ठिकाणी फार काळ टिकत नाही. इंडस्ट्रीमधील अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या कुटुंबातील लोकांसोबत हे घडलं आहे. मला कधी कधी खूप राग येतो जेव्हा लोक म्हणतात की, तुम्ही काहीत कष्ट करत नाही, मेहनत करत नाही.' सूरज पुढे म्हणाला, 'बॉलिवूड इंडस्ट्री सर्वांसाठी एकसमान आहे. पण काही लोक ही गोष्ट मान्य करत नाही त्यामुळे हे इथे काम करणं कठिण होतं. सोशल मीडियानं आता नव्ह आव्हान उभं केलं आहे. या ठिकाणी प्रत्येकजण समीक्षक आहे आणि तुमच्या बद्दलचा तिरस्कार एका सेकंदात सगळीकडे पसरतो. स्टार किड्ससाठी आता सोशल मीडियावर अशा तिरस्कारला तोंड देणं हे एक नवीन आव्हान आहे.' आपले आगामी चित्रपट आणि त्यातील भूमिकांबद्दल बोलताना सूरज म्हणाला, मला अॅक्शन चित्रपटांत काम करणं सर्वाधिक आवडतं. मी त्यासाठी खास ट्रेनिंग सुद्धा घेतलं आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवरून मला प्रत्येक प्रकारची भूमिका साकारायची आहे. एखाद्या गंभीर भूमिकेपासून ते खलनायकापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका मला साकारायच्या आहेत. मला फक्त अॅक्शन हिरो होऊन राहायचं नाही. हा अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा आहे. त्यानं २०१५ मध्ये 'हिरो'चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर २०१९ मध्ये तो 'सॅटेलाइट शंकर' या चित्रपटात दिसला होता आणि आता मागच्याच आठवड्यात १२ मार्चला त्याचा 'टाइम टू डान्स' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात सूरजसोबत कतरिना कैफची बहीण आहे. इसाबेलचा हा पहिलाच चित्रपट आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QuatrD