मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका व निर्माती असलेली राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यावर गेल्याची माहिती समोर येतेय. एकता तिच्या बहुचर्चित आगामी वेबसीरिजच्या यशासाठी प्रार्थना करायला तिथे गेली असल्याचं बोललं जातंय. एकताची '' ही वेबसीरिज काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी आशीर्वाद मिळावे म्हणून एकता अजमेर शरीफ यांच्या दर्ग्यावर गेल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यावेळेस तिच्यासोबत वेबसीरिज मधील कलाकार रिद्धी डोग्रा आणि मोनिका डोग्रा देखील उपस्थित होत्या. प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांच्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकावर 'द मॅरीड वूमन' ही वेबसीरीज बनवण्यात आली आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ही वेबसीरिज महिलांच्या आयुष्यावर आधारित असून त्यांच्या आवडीनिवडी, छंद, त्यांच्या भावना अधोरेखित करते. साधं आयुष्य जगणाऱ्या महिलांच्या आसपास फिरणारी कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद ठेवते. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी एकता जयपूर दौरा करत आहे. या वेबसीरिजच दिग्दर्शन साहिर रजा यांनी केलं असून ही एक शहरातील तकलादू नात्यांच्या गोंधळावर आधारलेली कहाणी आहे. समाजामध्ये महिलांना मिळणारा मान, त्यांच्यावर लावले गेलेले निर्बंध आणि स्वतःला शोधण्याची जिद्द यावर ही वेबसीरिज आधारलेली आहे. यात रिद्धी डोग्रा आणि मोनिका डोग्रा मुख्य भूमिकांमध्ये असून त्यांच्यासोबत इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास अहुजा या कलाकारांचा देखील सहभाग आहे. ही वेबसीरिज ८ मार्च रोजी ऑल्ट बालाजी आणि झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kPhYnL