Full Width(True/False)

एकेकाळी कंगाल झाले होते अनुपम खेर, पैशासाठी करावं लागलं होतं 'हे' काम

मुंबई: बॉलिवूड अभिनेते यांचा आज ६६ वा वाढदिवस. ७ मार्च १९५५ रोजी शिमला येथे जन्मलेल्या अनुपम यांनी मुख्य अभिनेता म्हणून महेश भट्ट यांच्या 'सारांश' चित्रपटातून १९८४ मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. तसं पाहायला गेलं तर १९८२ मध्ये आलेल्या 'आगमन' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 'सारांश'मधूनच. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात २८ वर्षाच्या अनुपम यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. ज्याचं खूप कौतुक झालं होतं. अनुपम खेर यांनी स्वतः एका अशा चित्रपटाची निर्मिती केली होती. ज्यामुळे त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी सांगितलं होतं. २००५ मध्ये अनुपम यांनी 'मैंने गांधी को नहीं मारा' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातून त्यांना बिझनेस टायकून व्हायचं होतं पण दुर्दैवानं या चित्रपटानं त्यांना कंगाल करून सोडलं. एका मुलाखतीत अनुपम म्हणाले, मला स्वतःचा स्टुडिओ तयार करायचा होता पण या चित्रपटानं माझे दिवाळे काढले. माझ्यावर अशी वेळ आली होती की, माझ्याकडे ५ हजार रुपये सुद्धा उरले नव्हते. त्यानंतर मी 'कुछ भी हो सकता है' या नाटकात काम केलं ज्यातून मला काही प्रमाणात आर्थिक फायदा झाला. २०१५ मध्ये मलेशियात आयोजित करण्यात आलेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात स्वतःचं अॅक्टिंग स्कूल सुरू करण्यामागची कहाणी सांगितली होती. २००५ मध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ' अॅक्टर प्रीपेअर्स' हे अॅक्टिंग स्कूल सुरू केल्याचं अनुपम यांनी सांगितलं होतं. अनुपम यांच्या मते जेव्हा ते चित्रपट निर्मितीमध्ये सर्व बाजूनी अयशस्वी ठरले त्यावेळी त्यांनी अॅक्टिंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याची सुरुवात फक्त १२ विद्यार्थ्यांवर झाली होती. पण पुढे जाऊन यात अनुपम यांना बराच आर्थिक फायदा झाला आणि ते आर्थिक नुकसानातून बाहेर पडले. अनुपम खेर यांनी आपल्या ३६ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये ५०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. खरं तर वयाच्या २८ व्या वर्षी ६५ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणं त्यांच्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकलं असतं. पण सुदैवानं या भूमिकेनं त्यांच्या करिअरला आकार दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OvzTUJ