नवी दिल्लीः सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइट () स्मार्टफोनचा उल्लेख जबरदस्त फीचर्स मिळणाऱ्या स्मार्टफोनमध्ये केला जातो. भारतीय बाजारात गेल्या वर्षी लाँच झालेल्या या स्मार्टफोनने अनेक भारतीय ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. S-Pen सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जर तुम्हाला हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण हा फोन आत १० हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. वाचाः ई-कॉमर्स साइट वर लिस्टेड नवीन किमतीसोबत ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन इंडिया वर लिस्टेड आहे. काही जरबदस्त ऑफर्स सोबत हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. या फोनच्या नवीन किंमतीवर नजर टाकल्यास या फोनचा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी मॉडल आता २९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. तर याची ओरिजनल किंमत ३८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः अमेरिकन एक्स्प्रेस (American Express) च्या क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर याची किंमत आणखी कमी होते नो कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा या फोनवर देण्यात येत आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला ४१ हजार ९९९ रुपयांच्या किंमती ऐवजी ३६ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. वाचाः फोनचे फीचर्स या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल च्या स्क्रीन रिझॉल्यूशन सोबत ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस Infinity-O सुपर एमोलेड डिस्प्ले दिले आहे. Exynos 9810 प्रोसेसर वर काम करतो. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात S-Pen stylus सपोर्ट मिळते. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स अटॅच केला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bAHV7A