Full Width(True/False)

...म्हणून आमिर खाननं घेतला बहुचर्चित 'महाभारत' चित्रपट बंद करण्याचा निर्णय

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसतो. हेच कारण आहे की त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. आमिर मागच्या दोन वर्षांपासून त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' चित्रपटावर काम करत आहे. पण आता अचानक आमिरनं हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या मते हा चित्रपट करण्याची ही योग्य वेळ नाही. तर सूत्रांच्या माहितीनुसार सध्या पौराणिक कथांवर आधारित चित्रपटांबाबत होणारे वाद टाळण्यासाठी आमिरनं हा निर्णय घेतला आहे. आमिर खाननं हिंदू धार्मिक ग्रंख महाभारतावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. काही काळानं आमिर चित्रपट नाही तर वेब सीरिजच्या स्वरुपात ही कथा प्रेक्षकांसमोर मांडणार असल्याच्या सुद्धा चर्चा झाल्या. पण आता अचानक आमिरनं हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्या जवळच्या सुत्रांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार सर्व चांगल्या-वाईट परिस्थितीचा अंदाज घेता आमिरनं हा चित्रपट तयार करण्याचा आपला निर्णय बदलला आहे. कोणत्याही कारणशिवाय सद्य परिस्थितीत यावरून वाद होऊ शकतात. याशिवाय ज्या भव्यतेत या चित्रपटाचं शूटिंग केलं जाणार होतं त्यासाठी कमर्शिअली काही त्रुटी असल्यानं आमिरनं तुर्तास या चित्रपटला पूर्णविराम दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाभारत चित्रपटासाठी जर आमिर त्याच्या किंमती वेळेतील पाच वर्ष देणार असेल तर याचा अर्थ तो कमीत कमी ३-४ बिग बजेट चित्रपटांना नकार देईल. पण आमिरला असं करायचं नाही. सध्याच्या काळात एका चित्रपटासाठी एवढा वेळ देणं आमिरला शक्य नाही. पण स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट आमिरनं अचानक असा बंद केल्यानं अनेकांचा रोख त्यानं वादपासून लांब राहण्यासाठी तर असं केलं नाही याकडे जास्त आहे. जेव्हा आमिरनं हा चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हापासून वादाला सुरुवात झाली होती. कट्टरपंथीयांनी 'महाभारत'च्या निर्मितीसाठी आमिर खानला चित्रपटाच्या राइट्ससाठी आव्हान दिलं होतं. याशिवाय काही काळापूर्वी अमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या तांडव या वेब सीरिजवरूनही बरेच वाद-विवाद झाले. या वेब सीरिजमधील काही दृश्यांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे आता आमिरनंही अशा वादांपासून लांब राहण्यासाठी आपला ड्रीम प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज लावला जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3baOuhb