पुणे टाइम्स टीम नवनवीन विषय आणि आशय असलेल्या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून नेहमीचं कौतुक होतं. आता मराठीतही निरनिराळे विषय हाताळले जात आहेत. त्या चित्रपटांतील भूमिका अधिक चांगली करण्यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेताना दिसतात. प्रेक्षक त्यांचं कौतुक करतात. शिवाय, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून अनेक पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. तिथे त्यांच्या अभिनयाचा गौरव केला जातो. ‘’ या चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता याचं या चित्रपटातल्या अभिनयासाठी कौतुक झालं. त्यासाठी त्याला फिल्मफेअरनं सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारानं गौरविलं आहे. शुभंकरला यंदाचा ‘बेस्ट डेब्यु फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. आपल्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर पुरस्कारानं भारावलेला शुभंकर त्याविषयी म्हणाला, ‘फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं, हे खूपच अभिमानाचं आणि स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या प्रत्येक अभिनेत्याचं हे स्वप्न असतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना अतिशय आनंद होतोय. मला चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत; कारण माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्यामध्ये त्यांनी कागरमधला हिरो पाहिला. मी चित्रपटाचा हिरो होऊ शकतो, हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचं (अभिनेता सुनील तावडे) मार्गदर्शनही मला सातत्यानं मिळत गेल्यानं मी इथवर पोहोचलो. सर्वांत महत्वाचं म्हणजे, मला हा पुरस्कार मिळण्यात प्रेक्षकांचा मोठ वाटा आहे. त्यामुळे त्यांचेही आभार.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uOuXeb