Full Width(True/False)

करोना लसः रजिस्ट्रेशन करताना 'या' चुका करू नका

नवी दिल्लीः करोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी भारतात लस देणे सुरू करण्यात आले आहे. देशातील कानाकोपऱ्यात आता लस उपलब्ध करण्यात येत आहे. परंतु, काही लोक याचा गैरफायदा घेत आहे. लसीची चुकीची माहिती देऊन लोकांना मेसेज, ई-मेल आणि सोशल मीडियावर चुकीचे माहिती सांगत आहेत. घेत असल्यास काही गोष्टी काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत. वाचाः केवळ CoWIN वेबसाइट वर होणार रजिस्ट्रेशन कोविन अॅपवरून बाजारात खूप चर्चा सुरू आहे. गुगल प्ले स्टोरवर सुद्धा एक अॅप आहे. परंतु, तुमच्या माहिती साठी सांगत आहोत की, ही केवळ सर्वसामान्य व्यक्तीसाठी कोविन वेबसाइट आहे. सरकारकडून करोना लस साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तेही केवळ अधिकृत वेबसाइटवरून. कोविड १९ लस साठी अधिकृत वेबसाइट http://cowin.gov.in. आहे. गुगल प्ले स्टोरवर कोविन अॅप आहे. पण, हे केवळ अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. वाचाः चुकूनही डाउनलोड करू नका कोणताही अॅप आरोग्या सेतू अॅप सोडून कोणताही अॅप डाउनलोड करू नका. ज्यावर असे सांगितले जात असेल की तुम्हाला करोना लस मिळेल. याशिवा, कोविन नावाची मिळती जुळता कोणताही अॅप डाउनलोड करू नका. करोना लस तुम्हाला केवळ रजिस्ट्रेशन करून दिली जाणार आहे. त्यासाठी http://cowin.gov.in वर करावे लागेल. वाचाः कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नका करोना लस संबंधी फोनवर कोणताही मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. जर अशी कोणतीही मेसेजची लिंक आली असेल तर ती चुकूनही ओपन करू नका. वाचाः करोना लसीसाठी ७ कागदपत्रे आवश्यक करोना लसीच्या रजिस्ट्रेशन साठी केवळ ७ कागदपत्रांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कोणीही जर काही कागदपत्रांची मागणी करीत असेल तर त्याला ती देऊ नका. या सात कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर कार्ड आणि पेंशन कार्ड याचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38kMqBe