नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी रेग्युलेटेशन चा दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे एसएमस आणि मिळवण्यात मोठा अडथळा येत आहे. बँकेकडून ग्राहकांना मिळणारे SMS आणि OTP मोबाइलवर यायला उशीर होत आहे. तसेच आधारची सर्विस सुद्धा त्यामुळे ठप्प झाली आहे. वाचाः दरम्यान, ऑपरेटर्सकडून त्यांच्या सिस्टमची पाठराखण करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला ते कंपनीला जबाबदार धरत असून त्यांच्याकडे विचारणा केली जात आहे. कंपन्या सोबतच रेग्युलेटरी स्टँडर्ड्स एसएमएस ट्राफिक अडचण येण्यास कंपनीची सेवा जबाबदार आहे, असे ऑपरेटर्सकडून बोलले जात आहे. जवळपास ५० टक्के एसएमएस व ओटीपी सेवा विस्कळीत झाली आहे. भारतातील टॉप बँकाचा यात समावेश आहे. एचडीएफसी आणि एसबीआय सारख्या बँकांचा यात समावेश आहे, अशी माहिती एका टेलिमार्केटिंगच्या कार्यकारी अधिकाऱ्याने दिली आहे. वाचाः आधार पोर्ट्लवर आलेला मेसेज म्हणजे आम्ही ओटीपी देण्यास असमर्थ ठरत आहोत, कृपया पुन्हा एकदा प्रयत्न करा. We are unable to reach authentication service to serve you OTP. असा मेसेज अनेकांना मिळत आहे. ट्रायच्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी एसएमएस डिलिवरी करण्याआधी प्रत्येक एसएमएस तपासायला हवा. त्यानंतर तो डिलिवर करायला हवा. या प्रोसेसला स्क्रबिंग असेही म्हटले जाते. आधीच उशीर झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री याला कार्यरत करण्यात आले आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स म्हणाले की, टेलिमार्केट्स आणि वैयक्तिक व्यापारी हे स्टँडर्डस सोबत त्यांनी त्यांची सेवा सुरू ठेवायला पाहिजे. वाचाः रेग्युलेशनची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. आम्ही कंटेट स्क्रबिंग प्रोसेससचे काम आमच्याकडून केले आहे. कंपन्यांना आधीच जास्त वेळ देऊनही जर त्या अद्याप तयारी करीत नसतील तर यात टेलकॉसची चूक नाही, असे टेलिकॉमचे एक वरिष्ठ कार्यकारी यांनी ईटीशी बोलताना सांगितले. एसएमएस फ्रॉडला आळा घालण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rqZSuR