मुंबई: अभिनेत्री सनी लिओनीनं महेश भट्ट यांच्या 'जिस्म २'मधून २०१२ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलं. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या बायोपिकमध्ये तिनं तिच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. एक अडल्ट स्टार अशी ओळख घेऊन आलेल्या सनीसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं आणि त्यासोबतच इथे टिकून राहणं खरोखरच मोठं आव्हान होतं. पण तिने ते पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात तिला बराच संघर्ष करावा लागला. सनी लिओनीनं तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं तिच्या या प्रवासाबद्दल आणि या दरम्यान आलेल्या कटू अनुभवांविषयी सविस्तर भाष्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये सनीनं तिला वयाच्या २१ व्या वर्षी तिरस्कारनं भरलेले अनेक इ-मेल येत होते असा खुलासा केला. याशिवाय लोक तिच्यावर अपशब्द वापरून कमेंट करत असत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरही तिच्या डान्स मूव्सवरून तिच्यावर टीका केली जात असे. तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकांचा पाठिंबा कधीच मिळाला नाही. पण त्यासोबतच आपल्याला अवॉर्ड सोहळ्यांमध्येही बॉयकॉट केलं गेलं होतं असं या व्हिडीओमध्ये सनी सांगितलं आहे. सनी सांगते, 'मला बराच संघर्ष करावा पण आता मी माझ्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. मला सर्वाधिक प्रसिद्धी 'बेबी डॉल' गाण्यानं दिली. आज माझ्याकडे चांगलं कुटुंब आहे. मी एक यशस्वी उद्योजिका आहे. मी आज जे आहे त्याचा मला अभिमान वाटतो. मी स्वतःच्या बळावर महिला झाले आहे.' सनी लिओनीनं हा व्हिडीओ ८ मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं शेअर केला आहे. या सोबतच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, या महिला दिनी मोज इंडियानं तुम्हाला व्यक्त होण्यासाठी अनफिल्टर नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. मी माझी कथा तुमच्यासोबत शेअर केला आहे. आता तुमची वेळ आहे. अनफिल्टर व्हा आणि तुमची स्टोरी जगासमोर मांडा.' सनी लिओनीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच अॅक्शन सीरिज अनामिकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन विक्रम भट्ट करत आहेत. या सीरिजमध्ये सनी अॅक्शन अवतारात दिसणार आहे. याशिवाय ती हॉरर कॉमेडी चित्रपट 'कोका कोला', 'रंगीला' आणि 'वीरमादेवी'मध्ये दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rxc0KT