Full Width(True/False)

'ये दादा आवर ये' म्हणत प्रार्थना बेहरे बसली चक्क मासे विकायला

मुंबई- महिला दिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपापल्या पद्धतीने महिलांना शुभेच्छा दिल्या. कुणी नवीन प्रकल्पाची घोषणा केली तर कोणी कुटुंबियांसोबत फोटो टाकत त्यांच्या सदिच्छा बोलून दाखवल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री हिने देखील सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी तिने खास फोटोशूट करून घेतलं. यात तिने भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या कष्टकरी महिलांच्या मेहनतीला सलाम केला आहे. तिने मासे विकणाऱ्या कोळिणीच्या वेशात केलेलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालं आहे. त्यासोबत तिने एका शेतकरी महिलेच्या वेशातदेखील फोटो काढले आहेत. ते फोटो शोषलं मीडियावर शेअर करत तिने सोबत सुंदरसा संदेशही दिला आहे. प्रार्थनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. प्रार्थनाने सुरुवातीला एक शेतकरी महिलेच्या वेशातील फोटो शेअर केले. ज्यात ती डोक्यावर गवताचा भारा वाहून नेताना दिसतेय. या फोटोतून तिने दिवसभर उन्हात घाम गाळून घर आणि देश चालवणाऱ्या महिलांना सॅल्यूट केला आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'या सौ. ज्योती अडागळे. सोनं पिकवाया लावते जोर, काळ्या आईची खंबीर पोर! संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.' जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम.' प्रार्थनाच्या या फोटोवर ५० हजाराहून अधिक लाईक आले आहेत. दुसऱ्या फोटोत प्रार्थनाने एका कोळीणीचा वेष केला आहे. त्यात ती हातात कोयता घेऊन मासे कापताना आणि विकताना दिसतेय. जणू ती येणा-जाणाऱ्यांना हाक मारून मासे खरेदी करण्याची गळ घालतेय. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, 'सौ. सुषमा माळी जसं लग्न झालं, तसं ती नवऱ्यासोबत मासेविक्री करते. संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.' 'जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम.' प्रार्थनाच्या या फोटोचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. तिच्या आगळीवेगळ्या कल्पनेचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. चाहत्यांनी तिला मासे कितीला दिले, मासे ताजे आहेत का, असे प्रश्न विचारलेत. या फोटोनादेखील आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लाईक मिळाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3elVeuw