Full Width(True/False)

पाहा पहिल्या दिवशी ‘मुंबई सागा’ सिनेमाने किती कोटी कमावले

मुंबई- करोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली सिनेमासृष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या आठवड्यापासून थिएटरमध्ये सिनेमे प्रदर्शित होऊ लागले आहेत. या आठवड्यात शुक्रवारी ‘’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी त्याला चांगला प्रतिसाद दिला. यासाठी सिनेमाचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे. आणि यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुंबई सागा' सिनेमाने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे. करोनाचा वाढत्या फैलावामुळे सध्या अनेक ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू असल्याने अनेक थिएटरमधील रात्रीचे शो बंद आहेत. त्याचा थोडाफार फटका या सिनेमाच्या कलेक्शनला बसला आहे. तरी देखील पहिल्या दिवसाची कमाई चांगली झाली असे म्हणावे लागले. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांच्या अभिनयाची जुगलबंदी 'मुंबई सागा' सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. हा सिनेमा २ हजार १०० थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं असून सिनेमात जॉनसह काजल अग्रवाल, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, रोनीत रॉय, गुलशन ग्रोव्हर, अमोल गुप्ते हे कलाकार आहे. या अॅक्शन सिनेमाचे बजेट सुमारे ६० कोटी रुपये असल्याचंही बोललं जात आहे. पहिल्या दिवशी झालेली बॉक्स ऑफीसवरील ही कमाई पाहता आगामी दिवसांमध्ये हा सिनेमा चांगली कमाई करेल असा विश्वास व्यक्त होत आहे. सिनेमाची कथा सत्यघटनेवर आधारीत मुंबई सागा हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत असून तो अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईक आणि अश्विन नाईक यांच्या जीवनावर आधारीत आहे. अंडरवर्ल्ड जगतावर आधारीत असलेल्या या सिनेमामध्ये पुरेपर अॅक्शनचा वापर केला आहे. या सिनेमात जॉन एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी याआधी आतिश, काँटे, शूट आऊट अॅट लोखंडवाला, शूटआऊट अॅट वडाळा अशा अंडरवर्ल्ड जगावर आधारीत असेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PcaL5K