Full Width(True/False)

प्रियांकाचा ऑस्कर नामांकित 'बिट्टू'ला पाठिंबा, सुरू केला उपक्रम

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल आणि सध्याची ग्लोबल स्टार नेहमीच काही ना काही कारणानी चर्चेत असते. सोशल मीडियावरून ती तिच्या आगामी चित्रपट तसेच कामांचे अपडेट चाहत्यांशी शेअर करताना दिसते. अभिनयासोबतच प्रियांका सामाजिक कार्यातही तेवढीच सक्रिय आहे. युनिसेफची ब्रॅन्ड अँबेसिडर असलेली प्रियांका या माध्यमातून वंचित भागातील मुलांसाठी कामही करते. आताही तिनं शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. प्रियांकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटाला आपला पाठिंबा देत प्रियांकानं एक नवा उपक्रम सुरू केला आहे. ज्यातून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांची मदत होणार आहे. या व्हिडीओमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन शक्य ती मदत करण्याचं आवाहन प्रियांकानं तिच्या चाहत्यांना केलं आहे. यासाठी प्रियांकाचं सोशल मीडियावर कौतुकही केलं जात आहे. यंदाचं ऑस्कर नामांकन मिळालेल्या बिट्टू चित्रपटात राणी आणि रेणू अशा दोन मुलींची कथा रेखाटण्यात आली आहे. ज्या खूप हुशार आहेत मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना शिक्षण घेता येत नाही. तसेच पक्कं घर, पिण्यायोग्य पाणी अशा मुलभूत सुविधांपासूनही या मुली वंचित आहेत. या दोन्ही मुलींचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ewK6v2